"उगवत्या सूर्याला जागं करणारी माणसं आयुष्याला यशस्वी गवसणी घालतात - डॉ. प्रकाश पांढरमिसे"
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील शहाजीराव विकास प्रतिष्ठानचे एस. बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन पोंदकुलवाडी येथे करण्यात आले होते. या शिबिराला दि.14 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. प्रकाश पांढरमिसे. यांनी सदिच्छा भेट दिली. व विध्यार्थ्यांना राष्ट्र उभारणीत तरुणाईचे योगदान "या विषयावर व्याख्यानपर मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी ते म्हणाले ,शहाजीराव विकास प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी इंदापूर, दौंड, करमाळा, माढा, माळशिरस या तालुक्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना होतो आहे.त्याचा अधिकाधिक लाभ विद्यार्थी घेत आहेत.या विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठे व्हावे व महाविद्यालयासह संस्थेचे व आपल्या गावाचे नाव मोठे करावे.आजच्या या महाकाय स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.तरचआजच्या या वाढत्या स्पर्धेच्या युगात तुम्ही टिकू शकाल.भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना भारताला नुसते विकसितच नव्हे तर जगाच्या नकाशावर दिमाखात ठळकपणे उठून दाखवायचे असेल तर आजच्या तरुणाईने आपले मन, मेंदू, मनगट आणि मणका मजबूत करायला हवा. आपल्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्राला महासत्तेच्या दिशेने झेप घ्यायला वेळ लागणार नाही.
उगवत्या सूर्याला जागी करणारी माणसं आयुष्याला यशस्वी गवसणी घालू शकतात. अशक्य हा शब्द ज्यांच्या शब्दकोशात नसतो त्यांनाच तरुण म्हणतात. या तरुणाईने जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर खूप मोठे परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही.
आजच्या तरुणाईने ज्यांच्या हाती शून्य होते.अशा शून्यातून विश्व् निर्माण केलेल्या कर्तबगार व्यक्तींच्या यशोगाथा, जीवनगाथा वाचल्या पाहिजेत. इतिहासात होऊन गेलेल्या महापुरुषांचा भूतकाळ जरूर वाचावा. या भूतकाळाचा वर्तमान बनवावा.तोच येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी भविष्यकाळ होईल. राष्ट्रीय सेवा योजनेचे हे सात दिवशीय शिबीर शिबिरात सहभागी झालेल्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. श्रमसंस्कारा बरोबरच वर्तनात परिवर्तन घडवून आयुष्याला सकारात्मक दिशेने नेहू शकते. असे मत डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी व्यक्त केले व शिबिरार्थी विध्यार्थ्यांना शिबिरातील उरलेल्या दिवसांसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अभिजित खंडागळे यांनी केले.त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील चार दिवसात केलेल्या कामाचा अहवाल सादर करताना गावकऱ्यांनी केलेले सहकार्य ही आमच्या साठी खूप मोठी पावती आहे असे मत व्यक्त केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी शिबिराविषयीं आपले अनुभव आदिती कुलकर्णी,निखिल देशमुख ओंकार सपकळ, गौरी पवार, ऐश्वर्या बंडगर यांनी सांगितले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी पाठक हीने केले तर तर यांनी आभार ओंकार सपकाळ याने मानले.यावेळी प्रा. यादव सर,प्रा. खंडू पवळ. प्रा. शिंदे सर, प्रा. नलवडे मॅडम, प्रा. वाघमारे मॅडम राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विध्यार्थी - विध्यार्थिनीं व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

