shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा..!!

घर पोहोच पुरस्कार आदर्श व अभिनव उपक्रम..!!

-------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :- 

दर्पण दिन व मुकनायक दिन निमित्त आदर्श पत्रकार समिती केज यांच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव केला जातो त्या निमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी पुरस्कार प्राप्त मान्यवरांना थेट त्यांच्या घरी जाऊन मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार दिला जाणार आहे.


आदर्श पत्रकार समितीच्या वतीने मागील १९ वर्षा पासून उल्लेखनीय वार्तांकन करणाऱ्या संपादक व पत्रकारांचा गौरव केला जात आहे. मात्र मागील दोन वर्षा पासून कोरोनाच्या महामारीमुळे कार्यक्रम घेता आला नाही. म्हणून या वर्षी आता कार्यक्रमाचे स्वरूप बदल करून थेट हे पुरस्कार मान्यवरांच्या दारा पर्यंत जाऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

दि. ३ मार्च रोजी जेष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर (दै. सुराज्य) यांचा आदर्श जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तर अनिल देशमुख (संपादक, डोंगराचा राजा) यांना आदर्श सोशल मीडिया पुरस्कार, पत्रकार दत्ता देशमुख (दै. सकाळ) यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार, सुशील देशमुख (दै. लोकप्रश्न) यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार दिले जाणार आहेत. 

हे पुरस्कार बीड येथील दै. चंपावती कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह शाल शिफळ देऊन पुरस्कार देण्यात येणार आहे. 

तर राजकीय विश्लेषक आणि ॲनालयझरचे संपादक सुशील कुलकर्णी यांना स्व. सुनील देशमुख यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श निर्भीड पत्रकार पुरस्कार हा औरंगाबाद येथे त्यांच्या कार्यालयात जाऊन पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

दि. ४ मार्च रोजी अंबाजोगाई येथील शासकीय विश्राम गृहावर परमेश्वर गित्ते (दै. वार्ता) यांना आदर्श संपादक आणि अविनाश मुडेगावकर स्व. मोहन भोसले यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श शोध पत्रकरिता पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यांसाठी आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, कार्याध्यक्षा सौ. रत्नमालाताई मुंडे, प्रा. हनुमंत भोसले, शिवदास मुंडे, धनंजय कुलकर्णी, धनंजय देशमुख, सुहास चिद्रवार, विजयराज आरकडे, सचिव गौतम बचुटे, शुभम खाडे, अमोल जाधव, प्रकाश मुंडे, धनंजय घोळवे, बाळासाहेब जाधव, बळीराम भोसले, महादेव काळे, उत्तरेश्वर शिंदे, अनंत जाधव, जय जोगदंड, शेख अर्षद, अक्षय वरपे, आझिम इनामदार हे उपस्थित राहणार आहेत.
--------------
close