shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*१३१) पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता..! मकार महेश... अर्थात साक्षात महादेव


महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र धुमधडाक्यात साजरा झाला. शिवशंकराच्या पूजेचा हा उत्सव. शिवशंकराचे/महादेवाचे वैज्ञानिक रूप कसे आहे याचे विवरण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या पानावर आढळते.
 

ओंकाराचे विवरण करताना ज्ञानेश्वर माऊलीने  नमूद केले आहे... 
'अकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू, मकार महेश.

१)अकार म्हणजे ब्रह्मा हा उत्पत्ती करतो. 
२)उकार म्हणजे विष्णू हा दैव देतो. 
३) मकार म्हणजे महेश/महादेव हा लय म्हणजे संहार करतो. 

ओमकाररूपी  ब्रह्मांडाच्या रचनेत शिवशंकराचे/महादेवाचे कार्य संहाराचे, लयाचे आहे. 
अर्थात संहार करताना शक्ती/ताकद/मसल पॉवर गरजेची असते. आणि मसल पॉवर वापरण्यासाठी अक्कल/ज्ञान असावे लागते.

  म्हणजे जेथे ज्ञान आणि शक्ती/ताकत आहे तोच हे कार्य करू शकतो. 

आपल्या देहात ज्ञान केंद्रे म्हणजे ज्ञानसंस्था आणि ताकद/शक्ती म्हणजे मज्जासंस्था कार्यरत असते.
जेव्हा मकाराचा अं (अम्) असा दीर्घ उच्चार केला जातो तेव्हा प्रथमतः आपल्या ओठांना स्पंदने जाणवतात. नंतरही स्पंदने चेहऱ्यावर गाल, नाक, डोळे, कान, कपाळ असा प्रवास करीत मेंदूपर्यंत, डोक्यापर्यंत पोहोचतात. आपल्या देहात शिवशंकराचा संचार अशाप्रकारे आपल्याला जाणवतो. 
या अशाप्रकारच्या मकाराच्या दीर्घ उच्चारांमुळे शरिराला मोठ्या प्रमाणावर स्पंदने प्राप्त होतात, ज्यामुळे मज्जासंस्था आणि ज्ञानसंस्था सशक्त होतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमालीची वाढते. यामुळे आपण कोणत्याही प्रकारच्या संकटाशी सामना करण्यास, लढाई करण्यास, शत्रूचा संहार करण्यास सक्षम होतो.

 मकाराच्या दीर्घउच्चाराने हे साध्य होते. आपणही हा प्रयोग करून अनुभवावे.

कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्ट पुणेच्या विद्यमाने पर्यावरण आणि आरोग्य साक्षरता मोहिमेंतर्गत प्रकाशित

लेखक : 
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने. देशभक्तकोशकार, पुणे.
मो.९८८१३७३५८५
close