श्रीरामपूर । प्रतिनिधी :- मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विभाग अध्यक्ष संतोष आवटी, यांना श्रीरामपूर बस स्टॅन्ड शेजारी एक विवो कंपनीचा मोबाईल सापडला होता सदर विवो कंपनी मोबाईल मालकाचा शोध घेतला असता छत्रपती शिवाजी रोड शालिमार मेडिकल शेजारी राहणाऱ्या बोरावके मावशी यांचा मोबाईल असल्याचे लक्षात आले व त्यामुळे त्यांना श्रीरामपूर येथील मनसे कार्यालय येते बोलून घेऊन त्यांचा मोबाईल त्यांना परत देण्यात आले.
त्याप्रसंगी बोरावके मावशी यांनी सांगितले की गेल्या दोन ते तीन तासा पासून हरवलेला मोबाईल आम्ही शोधत होतो माझे अनेक नातेवाईकांचे यामध्ये नंबर आहेत मी जरी नविन मोबाईल घेतला असता तरी एवढे नंबर परत घेण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले असते बस स्टँड शेजारी अनेकांचे मोबाईल चोरीला जात असते माझे मोबाईल चोरीला गेले असे मला वाटले होते परंतु माझ्या बहिणीला काळी पिवळी गाडीमध्ये बसून देत असताना खाली पडला असेल असेही मला वाटले. म्हणून मी अनेक वेळा या ठिकाणी मोबाईलचा शोध घेत होते. अशातच मनसे पक्षाच्या पदाधिकार्यांना माझे मोबाईल सापडल्याचे मला सांगितल्यावर मला खूप आनंद झाला व सर्व पदाधिकाऱ्यांचे बोरावके मावशी यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले.
एक वर्ष अगोदर असेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी चौकामध्ये मोबाईल सापडला होता अशाच पद्धतीने संबंधित व्यक्तीला तो मोबाईल परत करण्यात आला त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवून आणले.

