पूर्णा (सय्यद कलीम) :- येथून जवळच असलेल्या सुकी पिंपळगाव येथे खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेला सोलापूर येथील आरोपी सनिदेओल सुरेश काळे यांनी दोन वर्षांपूर्वी पूर्णा येथे एका इसमाचा खुन करुन फरार होता. त्यास काही दिवसानंतर पोलीसांनी पकडले होते. त्यावरुन तो आता सोलापूर येथील जेल कोठडीत आहे.
या गुन्ह्याचा सखोल तपास हा परभणीचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या पथक करीत होते. अशातच त्यांना सदर आरोपीने पूर्णा तालुक्यातील सुकी पिंपळगाव येथे एका जवळ गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलीस अधीक्षकाच्या मार्गदर्शन वरुन वाळूच्या ढिगात पोलीस यांना एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस मिळाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात आरोपी सनिदेओल काळे यांच्या विरूद्ध गु र नं ६७/२०२१, ३/२५, ७/२५,नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिस्तूल सापडल्याने पूर्णा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर गुन्ह्याची तपास पूर्णा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आश्रोबा घाटे, पोलीस नायक शेख वसीम, बंडूसिंग राठोड यांनी सोलापूर येथील आरोपींना आणण्यासाठी टीम तयार करुन पकडण्यासाठी जाणार असल्याचे समजते. पुढील तपास सपोनि आश्रोबा घाटे हे करीत आहेत.
पूर्णा परिसरात पिस्तूल मिळाल्याने एकच खळबळ माजली आहे.
परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मिना यांना पूर्णा,पालम, गंगाखेड,चुडावा येथील गोपनीय पोलीस यांना रेती व गुन्हेगाराची माहिती मिळत नाही? येथे लपवून ठेवलेला पिस्तूल हा परभणीच्या पोलीसांना माहिती होतो तर मग पूर्णा येथील गोपनीय पोलीस काय करीत आहेत? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

