राजषी शाहू कॉलेजच्या एम्स बॅच मध्ये निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले मत..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
शारदा इंग्लिश स्कूल केज येथील चार विद्यार्थ्यांची राजर्षी शाहू कॉलेज लातूर येथे हजारो विद्यार्थ्यांमधून घेतलेल्या परीक्षेमधून चार विद्यार्थ्यांची निवड झाली ही परीक्षा पूर्ण महाराष्ट्रभरातून विद्यार्थी परीक्षा देत असतात.प्रत्येक वर्षी शारदा इंग्लिश स्कूल केज च्या विद्यार्थ्यांची एम्स बॅच व रेगुलर बॅच मधे मोठ्या प्रमाणावर निवड होत असते. या वर्षी निवड झालेल्या एम्स बॅच मधील दीपक कराड, साक्षी चौरे,अथर्व सुरवसे, निकिता चौरे, या विद्यार्थ्यांचा सत्कार अर्चनाताई आडसकर यांच्या हस्ते आज करण्यात आला.
यावेळी बोलताना अर्चनाताई आडसकर यांनी शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेली प्रगती त्याचा उहापोह केला. प्राचार्य मिश्रा एस एम यांनी सांगितल्याप्रमाणे यापूर्वी शासकीय, निमशासकीय महाविद्यालय मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी, विविध अभ्यासक्रमाची अभ्यासक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी यांचाही नामोल्लेख अर्चनाताई आडसकर यांनी केला.
शारदा इंग्लिश स्कूलच्या या एका शाळेतून राजश्री शाहू कॉलेज लातूर असेल किंवा विविध उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था असतीलतील त्यामध्ये झालेले प्रवेश निश्चितच शाळेची,संस्थेची मान उंचावणारे असून माननीय रमेशरावजी आडसकर यांचे मार्गदर्शन, शाळेचे व संस्थेचे नियोजन, शिक्षकांचे उत्कृष्ट अध्यापन यामुळेच या बाबी शक्य झाल्याचे प्राचार्य मिश्रा एस एम यांनी सागितले.
यावेळी उपस्थित शाळेचे प्राचार्य मिश्रा एस एम, उपप्राचार्य सुरज सनी,देशमुख पी एम, जयश्री राजू, शिल्पा टॉमी, गिफ्टन जोस, बिंटो एन्ना एल्डोस, पूनम दुबे,सग्राम मोहिते सुभाष बिक्केड व ईतर कर्मचारी वर्ग उपस्थीत होता.

