शिर्डी । प्रतिनिधी(संजय महाजन):
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमीपूजन करुन वारकरी संप्रदायाला भव्य-दिव्य भेट दिल्याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले.
यावेळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे तुकोबारायांची पगडी,उपरणे,वीणा,चिपळ्या,व गाथा देऊन तसेच तुळशीहार घालुन मा.पंतप्रधानांचा विशेष सत्कार करण्यात आला व त्यांना श्रीक्षेत्र देहु येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले.
🚩🚩🚩🚩🚩🚩

