धुळे प्रतिनिधी दिलीप घरटे
सगरवंशिय जिरे माळी समाजाचा,बहुचर्चित प्रतिक्षीत,बहुरंगी, बहुआयामी, कर्तृत्ववान,नेतृत्वांच्या जिवनातील कटू गोड, सुखद,दुःखद प्रसंगाचा, काळाच्या पडद्याआड गेलेल्या समाज महर्षी,वर्तमान युगात कार्यान्वित समाज रत्न,महिला हिरकण्या ह्यांच्या कार्य कुशलतेचा, दिवंगतांच्या जन्मापासुन,कर्म सोहळ्याच्या यात्रे पर्यंतच्या घटनांचा उहापोह करणारा, त्यांची कार्यगाथा, यशोगाथा सदरांत सादर केलेल्या समाजातील नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारा व दिशा देणारा,समाजात एकात्मतेची क्रांती घडवून आणणारा वैचारीक पातळीचा अनमोल ठेवा लेखक- संपादक श्री.साहेबराव आनंदराव नंदन व श्री. ललितभाऊ सुधाकर साळवे यांच्या समग्र लेखणीतून उदयास आलेला सगर रत्न विशेषांक भाग एक काल फटाक्यांच्या आतषबाजीत पुष्प पाकळ्यांच्या वर्षावात धुमधडाक्यात प्रकाशित झाला . स्थळ- माधव स्मृती आदिवासी आश्रम शाळा,यशोदा नगर,सामोडे रोड, पिंपळनेर येथे शाळेचे चेअरमन, समाज भूषण, शिक्षण महर्षी बापूसाहेब ॲड.श्री. संभाजीराव पगारे साहेब ह्यांच्या शुभ करकमलांनी सगर रत्नांच्या,समाज बांधवांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात मोठ्या दिमाखात प्रकाशित झाला.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ताहाराबाद च्या मधू सुदन इंग्लिश मिडियम स्कूल चे चेअरमन श्री. मधूआण्णा साळवे यांच्या उपस्थितीत व सामाजिक कार्यकर्ते श्री काशिनाथ बापूजी नंदन, श्री.पंडीतनाना साळवे, श्री.विष्णूआप्पा जिरे साहेब,सौ.पुष्पलताताई पगारे,ताहाराबाद ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.शीतल योगेश नंदन,श्री.योगेश नंदन,कैलास नंदन, पी.एस.दादा पाटील, तसेच ताहाराबाद, पिंपळनेर,सामोडे, देशशिरवाडे,घोडदे, अंतापूर,दाभाडी, ओतूर,नेर,कुंसूबा,धुळे,नाशिक इ.विविध ठिकाणांहून आलेल्या अनेक समाज बांधवांची उपस्थिती प्रशंसनिय होती.
प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते राजा सगर,राजा भगीरथ,सावित्री बाई फूले,म.फूले.संत सावता महाराज ह्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले,नंतर दिप प्रज्वलन होऊन मान्यवर आसनस्थ झाले.
प्रास्ताविक लेखक संपादक श्री साहेबराव आनंदराव नंदन व श्री.ललितभाऊ सुधाकर साळवे ह्या दोघांनी अंकाची कुळ कथा मनोगतातून व्यक्त केली.
विविध मान्यवरांनी अंका संदर्भात मनोगत व्यक्त केले. त्यात प्रामुख्याने प्रा.सौ. सविताताई राजेंद्र पगारे डॉ . साहेबराव क्षीरसागर ' श्री गजानन साळवे ' श्री.काशिनाथ बापूजी नंदन,प्रा . अशोक देशमुख सर, प्रा.गवळी सर,प्रा. पंडीतनाना साळवे, मा.ए.टी.पाटील साहेब,डॉ.साहेबराव क्षीरसागर,श्री.सुभाष भाऊ नंदन शिवसेना बागलाण तालुका, प्रमुख,हिरकनी सौ. हेमलता ताई मानकर अश्या किती तरी मान्यवरांनी सगर रत्न अंकावर स्तूती सुमने उधळली.
ह्या अंकातील दिवंगत रत्नांच्या वतीने त्यांच्या प्रतीनिधींनी, वर्तमान रत्न, हिरकन्या ह्यांनी सगर रत्न पुरस्कार २०२२ चा स्विकार केला.
कार्यक्रमाच्या शेवटी मा.बापूसाहेब ॲड. संभाजीराव यशवंत राव पगारे ह्यांनी समाज बांधवांना संबोधित केले. अंकाचा उद्देश, महत्व,स्थान नमुद केले. तरुणाईवर प्रकाशझोत टाकला आणि मोलाचे मार्गदर्शनही केले.
व्यासपिठावरून ११ दिवंगत रत्नांच्या परिवारास, व २३ वर्तमान रत्न, हिरकण्या ह्यांना सन्मानपत्राने सन्मानीत करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डी. टी.पाटील सर ह्यांनी केले.
भविष्यात लवकरच भाग दोन निघेल त्या साठी समाज बांधवांनी संपादकांशी उपलब्ध माहितीसह संपर्क साधावा.असे आवाहन प्रा.डी.टी. पाटील यांनी केले . सदरचा कार्यक्रम शांतता,शिस्तीत,मोठ्या उत्साहात चार तास खिळवून ठेवणारा होता.सरतेशेवटी उशिरापर्यंत चाललेल्या कार्यक्रमा च्या अनेक आठवणी मनात साठवून समाजबांधव घरी परतत होते.

