shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सांडवे सेवा सोसायटी मध्ये विष्णूपंत खांदवे यांना निर्विवाद बहुमत

 प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : ९ /  नगर तालुक्यातील सांडवे वि. का.सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत विष्णूपंत खांदवे यांच्या नेतृत्वाखालील जगदंबा शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १२ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे .
विरोधकांना एकही जागा मिळू शकली नाही  सर्वच्या सर्व जागा जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. 


सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून ( ८ जागा ) शिक्षक नेते विष्णुपंत खांदवे ( २०९)यांच्या सह भाऊसाहेब खांदवे,(१८४) मोहन खांदवे(१६९),रावसाहेब खांदवे,(२०५), विजयकुमार खांदवे (१७९), शेख बुऱ्हाण बापूभाई,(१८९), साईनाथ शिंदे ( १८६)व , रघुनाथ वायकर (१९३),
महिला राखीव प्रवर्गातून सौ.छबुबाई अंबादास खांदवे ( १८३),सौ.मिना प्रवीण खांदवे (१९८)
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून हरिशचंद्र आरु(२०६),व
इतर मागास प्रवर्गातून सर्जेराव शिंदे( १८६) हे प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत.

सर्व विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . मा.मंत्री शिवाजीराजे कर्डीले साहेब तसेच शिर्डी एक्सप्रेस अहमदनगर टीम यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
close