शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०९ मार्च २०२२
मल्हाराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय-अंभोरे येथे महिला दिन उत्साहात संपन्न..!!
विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच महिला मदतनीस यांचा पुष्पगुच्छ,शाल,नारळ देत यथोचित सन्मान..!!
संगमनेर (अंभोरे): मंगळवार ता.०८ मार्च रोजी जागतिक महिला दिन निमित्ताने सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाचे मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंभोरे तालुका संगमनेर येथे महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती देशमुख मॅडम या होत्या तर प्रास्ताविक श्री. कुदळ सर यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी आहील्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचला हार, पुष्प अर्पण करून. कार्यक्रमाला सुरुवात केली.
जागतिक महिला दिनानिमित्त उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती गवारे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ज्यांना स्त्री आई म्हणून कळली ते जिजाऊंची शिवबा झाले! ज्यांना स्त्री बहीण म्हणून कळली ते मुक्ताई चे ज्ञानदेव झाले ! ज्यांना स्त्री मैत्रीण म्हणून कळली ते राधेचे शाम झाले! स्त्री म्हणजे अथांगावर मात ! स्त्री म्हणजे क्षणांची साथ ! स्त्री म्हणजे वास्तव्य ! स्त्री म्हणजे कर्तुत्व ! स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व..!!! या काव्य पंगक्तीने सुरुवात केली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आज मला सांगण्यात आनंद वाटतो की असे कुठले क्षेत्र नाही तिथे स्त्री नाही सर्वच क्षेत्रात स्त्रीयांनी उत्तुंग भरारी घेत आपआपल्या क्षेत्रात प्रगती करत नावलौकीक मिळवत उत्तुंग यश संपादन केलेल असल्याचे एक ना अनेक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत.
पूर्वीच्या काळात असा समज होता की स्त्रियांनी फक्त 'चुल' आणि 'मुल' संभाळण हेच त्यांचे जग आहे. हेच त्यांनी करायला पाहिजे एवढंच नव्हे तर याची सुरुवात आपल्या घरापासूनच होत होती महिलांना,मुलींना घरापासून दुय्यम स्थान दिले जात होते. शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते, स्त्रियांनी नोकरी करणं घराबाहेर पडणं हे अयोग्य ठरवलं जात होतं त्यांनी फक्त घरातीलच सर्व कामं करावी आणि नोकरी करावी ती फक्त पुरुषांनी शिकाव ते फक्त पुरुषांनीच अशी समाजात जणु परंपराच पडली होती.
परंतु अलिकडे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वागणूक दिली जात आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून महिला या सर्व क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती करतांना दिसत आहे." स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" या युक्ती वरून आपल्याला आईचे म्हणजेच एका स्त्रीचे किती महत्त्व आहे हे समजते.
मनोगताचा शेवट करताना त्यांनी स्व: निर्मित स्व: लिखित "गर्व है मुझे की नारी हू मैं !!" या काव्य पंगक्तीने उपस्थीत विदयार्थी आणि शिक्षकांना तर त्यांनी मंत्रमुग्धच केले.
माध्यमिक विद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींच्या आणि महिलांच्या शैक्षणिक,सामाजिक, आणि कौटुंबिक आशा सर्वच जीवनावर कसा परिणाम झाला. त्यांनी मुलींच्या शिक्षणाकरिता पाहिली शाळा सुरू केली. हे करत असताना त्यांना अनेएक हाल, अपमान, कष्ट सहन करावे लागले आणि हे सगळ सहन करुन त्यांनी स्त्री शिक्षणाचे जे बीज पेरले त्याचा आता वटवृक्ष झालेला आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी जे कार्य केले. ते महान,अथांग, आणि अगणित असे आहे त्यांचे उपकार कधीही न फिटण्या सारखे आहेत.
तसेच आपल्या पाल्यांना शैक्षणिक शिक्षणं देता देता नैतिकतेचे आणि आत्मसंरक्षणाचे हि धडे द्यायला हवेत. परंतु सांगायला खेद वाटतो की महिलांवर कधी-कधी आण्याय, आत्यचार होतो. याचे दु:ख ही होतें पालकांनी आपल्या मुली पेक्षा आपल्या मुलांचा महिलांचा आदर करायला शिकवा , दुसऱ्याना मदत करायला शिकवा, सन्मानाने वागायला शिकवा. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी.... ती जगाची उद्धारी'.. ! मुलींनो आधुनिकतेच्या नावाखाली बिनधास्त आणि सैराट होऊ नका. परंपरा आणि सांस्कृतिच भान कायम असू द्या. अशा शब्दात तीने आपले मनोगत व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत होळकर विद्यालयातील शिक्षकांनी आणि शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी तसेच महिला मदतनीस यांचा पुष्पगुच्छ,शाल,नारळ देत यथोचित सन्मान देखिल करण्यात आला. विद्यालयातील स्वच्छता आणि मुलांना गोड असे अन्न शिजवणे व इतर अनेक महत्त्वाची कामे देखील त्या करत असतात. म्हणून त्यांचा सत्कार करुन त्यांच्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न विद्यालयाने केला.
त्यांच्या या अचानक केलेल्या सत्कारामुळे त्या ही भारावून गेल्या. या कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी कष्ट घेतले.
या कार्यक्रमाकरिता ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती देशमुख मॅडम,श्री. कुदळ सर, सोनावणे मॅडम, तारडे मॅडम, वरपे मॅडम, काळे मॅडम, कडणर सर, गायकवाड,सर, सोसे सर, राऊत सर, जाधव सर, भालेराव सर आणि सर्व सहशिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वृंद उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

