shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्तबगार पोलिस अधिकारी बनून इंदापूर तालुक्याची शान वाढवा - हर्षवर्धन पाटील.

कर्तबगार पोलिस अधिकारी बनून इंदापूर तालुक्याची शान वाढवा - हर्षवर्धन पाटील.
इंदापूर प्रतिनिधी: कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून आपण आपले व आपल्या तालुक्याची शान वाढवावी असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत इंदापूर तालुक्यातील दिलीप शिवाजी धालपे, शैलेश देवराव मोरे, चेतन अनिल ढावरे, अशोक बाळासाहेब नरूटे, यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . त्यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित करताना दि. ९ मार्च २०२२ रोजी आपले मत व्यक्त केले.
यावेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अतिशय प्रामाणिक व कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून आपण आपले व आपल्या तालुक्याची शान वाढवावी आपल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेसाठी सर्वांना सोबत घेऊन आपण काम करावे असे हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले.
close