shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

.श्री.नारायणदास रामदास स्कूल तर्फे अनिता खरात व माधुरी लडकत यांचा कर्तुत्ववान महिला म्हणून सन्मान.


श्री.नारायणदास रामदास  स्कूल तर्फे  अनिता खरात व माधुरी लडकत यांचा  कर्तुत्ववान महिला म्हणून सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी:८ मार्च (मंगळवार) रोजी महिला दिनाचे औचित्य साधून श्री नारायणदास रामदास इंग्लिश मिडियम स्कूल, इंदापूर. येथे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ तसेच शालेय विविध  स्पर्धा  पुरस्कारांचे वितरण समारंभ आयोजित केला होता. यावेळी इंदापूरच्या नगराध्यक्ष अंकिताताई शहा यांच्या हस्ते सध्या सर्व स्तरावर अतिशय उत्कृष्ट काम करत असलेल्या तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष व महिला दक्षता समितीच्या सदस्या अनिताताई खरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तसेच पोलीस खात्यात आपली जबाबदारी अतिशय चोखपने  पार पडणाऱ्या सिंघम महिला पोलीस अधिकारी  माधुरी लडकत यांचाही सन्मान अंकिता शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळेस समीक्षा राऊत  व संस्थेचे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळेस अनिताताई खरात यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आज महिला दिन आज महिला या सर्व ठिकाणी तत्पर आहेत महिला आपली सर्व जबाबदारी अगदी चोख पार पडते , आपले घर परपंच सांभाळत महिलांनी समाजातील गोरगरीब होतकरू विद्यार्थी यांना मदत करणे ही काळाची गरज आहे तसेच महिलांनी समाजात काम करत असताना आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही  याची ही जबाबदारी घ्यावी तसेच त्यांनी महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या
 कार्यक्रमाचे नियोजन  मुख्याध्यापिका सौ. फौजिया रियाज शेख को- सौ रेहाना मुजीब शेख शालेय सांस्कृतिक वि.भा. श्री नारायणदास रामदास इंग्लिश मिडीयम स्कूल, इंदापूर यांनी  केले
close