shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी मध्ये महिला दिनानिमित्त महिला आरोग्य तपासणी आणी 'रंगला खेळ पैठणीचा'*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी मध्ये महिला दिनानिमित्त महिला आरोग्य तपासणी आणी 'रंगला खेळ पैठणीचा'*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी मध्ये महिला दिनानिमित्त महिला पालकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन*

इंदापूर प्रतिनिधी:जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी मध्ये दिनांक ८ मार्च २०२२ जागतिक महिला दिनानिमित्त महिला पालकांसाठी व लाखेवाडी परिसरातील महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये वीरमाता,विरपत्नी, यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या मध्ये विद्या निकेतन कॉलेज फ़ार्मसी च्या विद्यार्थ्यांनी ३०० महिलांचे रक्तगट, रक्तदाब आणी हिमोग्लोबीन तपासणी केली
  महिलांसाठी विविध स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, दररोजच्या दैनंदिन कामातून मनोरंजन , तसेच बौद्धिक चालना म्हणुन *चालता- बोलता* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यामध्ये महिलांना विविध प्रश्न विचारून अचूक उत्तरे देणाऱ्या महिलांना *चांदीचे नाणे* देण्यात आले.
विविध प्रकारचे गमतीदार खेळ घेऊन महिलांसाठी बक्षिसांची खैरात  करण्यात आली. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी पैठणी साड्या व सहभागी महिलांसाठी गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या.
वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे अविरतपणे चालू ठेवण्यासाठी व संत परंपरा जपण्यासाठी सदैव तत्पर असणारे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. श्रीमंतजी ढोले सर यांनी महिला दिनाचे औचित्य साधून लाखेवाडी गावातील महिला भजनी मंडळांना भजन, कीर्तन उपयोगी साहित्याचे  टाळ, मृदंग, वीणा, पेटी, इत्यादीचे वाटप करण्यातआले. स्त्री जन्माचे कहाणी, स्त्री कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या गाण्यावरती महिला शिक्षकांनी नृत्य करून करून आलेल्या पालकांचे मनोरंजन केले. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पाऊल टाकले आहे याची जाणीव करून देणारे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले.
संस्थेच्या उपाध्यक्षा.सौ. चित्रलेखा ढोले मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन केले, त्यांनी सांगितले की , पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीयांनीआपले अस्तित्व टिकवून ठेवावे, विविध क्षेत्रात महिला कशा चमकतील असे प्रयत्न करावे,स्त्री जन्माचे स्वागत करा!
नारी शक्तीचा विजय व्हावा!असे मत व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर व संस्थेचे प्रमुख सल्लागार  प्रदीप गुरव सर (मा. शिक्षणाधिकारी) यांनी महिला दिनानिमित्त आलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सर्व स्पर्धा कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासक  गणेश पवार सर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य खेडकर सर, सर्व विभागाचे सुपरवायझर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
close