shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अरुण तुपविहीरे यांना राज्यस्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार जाहीर..!

राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. ८-३-२०२२
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठातील उपक्रमशील विज्ञान शिक्षक अरुण तुपविहीरे यांना शिक्षक गटासाठी दिला जाणारा   प्रथम क्रमांकाचा  राज्यस्तरीय डॉ.सी. व्ही. रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जळगाव येथील नोबेल फाउंडेशन आणि श्रम साधना ट्रस्टचे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी तर्फे नोबेल विज्ञान पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.  अशी माहिती नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील यांनी दिली.

या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सभापती डॉ.प्रमोद रसाळ, सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा धनवटे उपमुख्याध्यापक प्रा.नंदकुमार मुळे, पर्यवेक्षक संदेश विसपुते, प्रा. जितेंद्र मेटकर , क्रीडाशिक्षक शमशुद्दीन इनामदार, बाळासाहेब डोंगरे , दशरथ दळवी व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.
अरुण तुपविहीरे यांनी  विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयात आवड ,संशोधन वृत्ती , अंधश्रद्धा निर्मूलन ,वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याकरिता   विविध उपक्रम ग्रामीण भागातील शाळेत व गावात  जाऊन राबविले आहेत.

तसेच शालेय स्तरावर , हसत खेळत विज्ञान प्रयोग,अपूर्व विज्ञान मेळावा ,विज्ञान कार्यशाळेचे आयोजन ,   नामवंत संस्थांना  भेटी देणे,  शास्त्रज्ञांचे  व्याख्यानाचे आयोजन ,  विद्यार्थ्यां करीता इस्रो केंद्रास भेट. विशेष  दिनानिमित्त  वेबसाईटद्वारे प्रश्नमंजुषा , क्किजचे आयोजन,या विविध उपक्रमा द्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण करण्याचे कार्य अरुण तुपविहिरे हे करत आहेत . ते लवकरच विद्यार्थ्याकरिता एन एम एम एस परीक्षेच्या सराव अभ्यासाकरीता मोफत ॲप उपलब्ध करून देणार आहेत.
close