रणगाव येथे शैलेश मोरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवडीबद्दल सत्कार संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील रणगाव येथील शेतकरी असणाऱ्या मोरे कुटुंबातील शैलेश देवराव मोरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव पूर्ण सत्कार रणगाव येथील त्यांच्या निवास्थानी करण्यात आला.
यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील ,पुणे जिल्हा भाजप शिक्षक आघाडीचे अध्यक्ष संतोष कदम सर,इंदापूर तालुका सोशल मीडिया उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे,ग्रामपंचायत सदस्य सचिन शेठ अचलारे ,सागर भोसले, राजेन्द्र हागवणे, किशोर हगवणे , यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शैलेश मोरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा रणगाव येथे झाले असून माध्यमिक शिक्षण हे रणगाव येथील हायस्कूल मध्ये झाले.त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर येथे वाणिज्य शाखेत झाले.त्यांचे पदवी शिक्षण हे विद्या प्रतिष्ठान बारामती येथे व पोस्ट ग्रॅज्युएशन हे पुणे युनिव्हर्सिटी येथे झाले व ते प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले.२०१५ पासून ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करत होते.विशेष बाब म्हणजे त्यांनी कोठेही क्लास न लावता स्वतः अभ्यास करून एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

