शिक्षकांची सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक सुनील वाघ यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीकरिता पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आज सोमवारी दिनांक २१ मार्च पासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली नामनिर्देशना च्या पहिल्याच दिवशी संस्थेचे माजी चेअरमन सुनिल वाघ यांनी आपला नामनिर्देश अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जिजाबा गावडे यांच्याकडे दाखल केला. याच सोबत संस्थेचे विद्यमान चेअरमन वसंत फलफले आणि माजी चेअरमन सुनील नारायण शिंदे यांनी देखील आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला .यावेळी दीपक वाघ ,सचिन वेदपाठक ,सचिव संजय लोहार ,हरीश काळेल, अमोल बोराटे आदी उपस्थित होते .उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजता फलफले सह एकूण सहा उमेदवार यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

