शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये जय हनुमान व्यायाम शाळा व फिटनेस क्लब वडापुरीचा निलेश शेलार 'इंदापूर श्री चा ठरला मानकरी .
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १४ मार्च २०२२ रोजी शहा सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी एबीएस जिम च्या वतीने शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ४७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये प्रथम पुरस्कार वडापूरी येथील हनुमान व्यायाम शाळा व फिटनेस क्लबचा निलेश शेलार हा 'इंदापूर श्री चा मानकरी ठरला' तर द्वितीय क्रमांक एबीएस जिमचा निलेश ढावरे विजेता ठरला . हा पुरस्कार कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ॲड . राहुल मखरे, शकीलभाई सय्यद, अरबाज शेख, प्रशांत उंबरे व इतर मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.
निलेश शेलार यांना मार्गदर्शन वस्ताद किरण गोसावी यांचे लाभले असून शेलार याचे विशेष कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.

