गंगाखेड(प्रतिनिधी) :-
गंगाखेड तालुक्यातील गेल्या 22 दिवसापासून सुरू आसलेल्या "एक गाव एक दिवस याप्रमाणे बेमुदत साखळी आंदोलन" सुरू केले. परंतु या कुंभकर्णसारखे झोपेचे सोंग घेवून झोपलेले या सरकारला जाग आण्यासाठी डोंगरी जन परिषदेतर्फे गंगाखेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भव्य रास्ता रोको करण्यात आला.
या रस्ता रोकोमध्ये संपुर्ण तालुक्यांतील अनेक गावच्या शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदविला होता व मा तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यात आले.यामध्ये डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयोजक श्री पंडितराव घरजाळे, आश्रोबा नाना सोडगीर, गोपीनाथ भोसले,का. राजन क्षीरसागर , पंडीत सोडगिर , बालासाहेब मुंडे, सीताराम देवकते, प्रदिप गोटू मुंडे, भगीरथ फड, योगेश फड, बळीराम मुंडे, नितीन खोडवे, गुलाबराव शिसोदे, दादासाहेब खंडेकर, वाल्मीक केंद्रे, अर्जुन जयभाये आदी आनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

