shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अत्याचार करणाऱ्या इसमाला १० वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा..!

पूर्णा । वार्ताहर :
लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या पंढरीनाथ प्रभाकर दिपके या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांनी १० वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.


       परभणी तालुक्यातील सावंगी खु. येथील पंढरीनाथ प्रभाकर दिपके याने दि.१६ डिसेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०२० पर्यंत एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिचे सोबत शारिरीक संबंध ठेवले. जेंव्हा महिलेच्या पोटात वेदना होवू लागल्या तेंव्हा सोनेग्राफीतून ती महिला गर्भवती असल्याची बाब समोर आली. तेंव्हा या दिपके याने त्या महिलेस लग्नाकरीता स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संबंधित महिलेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अरिफोद्दीन ताजोद्दीन काझी यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

       न्यायालयात चार साक्षीदार तपासले गेले. त्या वैद्यकीय अधिकार्यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारी अभियोक्ता ऍड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार अभियोक्ता ऍड. सुनंदा चावरे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिस अधिक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, अंमलदार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, दत्तात्रय ढगे, प्रमोद सूर्यवंशी यांनी या प्रकरणात मोलाची भूमिका बजावली. 

        सूनावनी अखेर न्यायाधीश पिंगळे यांनी संबंधित आरोपीस दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली..
close