अमरावती :- पी एम शहा फाउंडेशन पुणे,अंतर्गत सतत दहा वर्षापासून आरोग्य जनजागृतीच्या उद्देशाने, फक्त आरोग्य विषयावर आधारित आरोग्य फिल्म महोत्सव घेण्यात येतो. या महोत्सवात देश विदेशातून हजारो फिल्म येत असून, त्यात काही निवडक व विशेष लघुचित्रपटाची निवड, प्रसिद्ध फिल्ममेकर आणि ज्युरी मार्फत करण्यात येते.
या आरोग्य फिल्म फेस्टिव्हल मध्ये अमरावती येथील लेखक दिगदर्शक तथा आरोग्य विभागात कार्यरत असणारे धर्मा वानखडे यांच्या "एनसीडी" व "रेस" या दोन्ही लघुचित्रपटाला नामांकन मिळाले असून हि अमरावती करिता अभिमानाची बाब आहे.
दोन्ही फिल्म ची निर्मिती धर्मा फिल्म ची असून "एनसीडी" फिल्म च्या निर्माती अर्चना चौरपगार व कार्यकारी निर्माता राहुल पाटील आहे.आणि दोन्ही फिल्म चे कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन धर्मा वानखडे यांचे असून सहदिगदर्शक व संकलन भारत वानखडे यांचे आहे.
सिनेमॅटोग्राफर इरफान शेख असून सदर लघुपटात धर्मा वानखडे,दिनेश इंगोले, प्रीती सोनटक्के, ज्ञानेश्वरी काकडे बालकलाकार वंशिका इंगळे इत्यादी कलाकारांनी काम केले आहे.

