वडापुरी येथे राजवर्धन पाटील यांच्या हस्ते मुस्कान फेब्रिकेशन अँड ट्रेलर्स चे उद्घाटन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील मातोश्री व्यापार संकुल पंधारवाडी वडापुरी येथील मुस्कान फॅब्रिकेशन आणि ट्रेलर्स या व्यवसायाचे उद्घाटन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
पंधारवाडी येथील रहिवासी असलेले नबीलाल शेख यांचे सुपुत्र अमीर शेख हे गेली दहा वर्षापासून फेब्रिकेशन व्यवसायामध्ये काम करत असून त्यांनी आज स्वतःचा पंधारवाडी वडापुरी येथील मातोश्री व्यापार संकुलन याठिकाणी एक नंबर गाळ्यांमध्ये फॅब्रिकेशन व्यवसायाची उभारणी केली आहे. त्यांना उत्तम असा अनुभव असल्याने त्यांच्या हातून ग्राहकांची फॅब्रिकेशनची कामे अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उत्तम दर्जाचे होतील असा विश्वास राजवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले की, अमीर शेख याने निवडलेला व्यवसायातून शेती, गृह , वाहन तसेच फॅब्रिकेशन मधील विविध पद्धतीचे कामे होत असल्याने त्यांचा तो निवडलेला व्यवसाय उत्तम रित्या चालून त्यांचे जीवन यशस्वी व उत्तम घडणार आहे. अमीर शेख यांना असलेल्या अनुभवातून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालेल व इतर युवकांना त्याचा आदर्श वाटेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले . तसेच शेख कुटुंबास या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा उद्योजक अमोलराजे इंगळे ,भैरवनाथ ट्रस्ट अध्यक्ष हनुमंत तोबरे, वडापुरी चे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे, माजी सरपंच नारायण नलवडे, युवा नेते दत्तात्रय गायकवाड, सिव्हिल इंजिनिअर मुक्तार मुलांनी, युवा नेते बबलू पठाण, तात्यासाहेब कोरटकर , साई फॅब्रिकेशन चे रहीमान शेख, वस्ताद किरण गोसावी,वस्ताद मोहसीन शेख,मातोश्री व्यापार संकुलन चे मालक नवनाथ भोंग्, एलआयसी एजंट अमीर शेख. ,परशुराम करगळ, सुनील पिंगळे, नबीलाल शेख, शाहरुख शेख इत्यादी मान्यवर यांनी उपस्थित राहून या नवीन व्यवसाय शुभेच्छा दिल्या.

