shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर : शिंदोडी शिवारात विजेच्या टॉवरवर तारांची चोरी करताना गळफास लागून राहुरीच्या तरुणाचा मृत्यू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक ०७ मार्च २०२२

विजेच्या टॉवरवरील वीजवाहक अल्युमिनियम तारांची चोरी करताना एकाचा मृत्यु : इनोव्हा कार सह टेम्पो जप्त..!!
 
संगमनेर : उच्चदाब विद्युत वाहिनी टॉवरवरील विजेच्या तारांची चोरी करत असताना तार तुटल्याने कमरे भोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाला. योगेश रावसाहेब विघे ( वय २० वर्ष, रा. पिलानी वस्ती चिकलठाण ता. राहुरी ) असे मयताचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एक विधीसंघर्षीत बालकाचाही समावेश आहे. इनोव्हा कारसह (क्र.एम.एच.२०ए.जी.५२५८ ) पोलीसांनी टेम्पोही (क्र.एम.एच.१७ बी.डी.०२९७ ) जप्त केला आहे.

ही घटना संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात रविवारी (दि.६) पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. विशाल राजेंद्र पंडीत (वय १८) , आदित्य अनिल सोनवणे (वय २०) दोघेही रा. शिंदोडी ता. संगमनेर , संकेत सुभाष दातीर ( वय २६, रा. प्रिंप्रिलौकी ता.संगमनेर ) व सरफराज इक्बाल शेख (रा. रामगड ता. श्रीरामपुर) व एक विधीसंघर्षीत बालक अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश रावसाहेब विघे यास विशाल आणि आदित्य हे शिंदोडी येथे घेऊन आले. या सर्वांनी पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान शिंदोंडी शिवारात उच्चदाब विद्युत वाहून नेणाऱ्या टॉवरवर टॉवरची उंची जास्त आहे असे माहिती असताना देखील योगेश विघे यास चोरी करण्याच्या उद्देशाने बळजबरीने विजेच्या टॉवरवर चढवले. त्यास टॉवरवरील अॅल्युमिनियम धातुच्या विजेच्या तारा कापण्यास सांगितले . त्याच्याकडून तारा कापून घेतल्या आणि त्याच दरम्यान तारा कापत असताना तार तुटतेवेळी योगेश याच्या पोटास बांधलेल्या दोरीने गळफास बसल्याने योगेशची हालचाल पूर्ण बंद झाली.त्यानंतर वरील पाच जणांनी इन्होवा कारमधून योगेशला औषध उपचारासाठी लोणी येथील पी.एम.टी हॉस्पीटल मध्ये नेत असताना लोणी पोलिसांना वाहनाचा संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली. योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. याप्रकरणी रावसाहेब सुखदेव विघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसांनी चौघांसह एका विधीसंघर्षीत बालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


.
close