श्रीमती. तुळसाबाई (नानी) मारुती भोंग यांचे दुःखद निधन.
इंदापूर प्रतिनिधी: निमगाव केतकी व संपूर्ण पंचक्रोशीत एक आदर्श माता म्हणून नावलौकिक मिळविलेल्या श्रीमती तुळसाबाई मारुती भोंग(वय वर्षे ९१ ) यांचे रविवार दि.६ मार्च २०२२ रोजी सकाळी ७ वाजता रहात्या घरी दुःखद निधन झाले. तुळसाबाई भोंग या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच लाडक्या होत्या.सगळे त्यांना नानी या नावाने बोलत .नानी यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,सुन,नातु,नात सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. नानींच्या अंत्यविधीसाठी पुणे जिल्ह्यातुन नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळसाबाई भोंग यांना सावडण्याचा विधी मंगळवार दि.८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे.
त्या इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष,ग्रा.पं.निमगाव केतकी चे माजी सदस्य माणिक (आबा) भोंग, इंदापूर तालुका सुकाणू समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोंग, विठ्ठल भोंग यांच्या आजी होत्या.

