शिर्डी । प्रतिनिधी : ( संजय महाजन ) : -
शिर्डी येथे रविवारी होणाऱ्या महा परिक्रमा या महामार्गावर जय बाबाजी भक्त परिवार शिर्डी यांच्यावतीने आज साफसफाई करण्यात आली. शिर्डीतील जय बाबाजी भक्त परिवार यांनी या परिक्रमा मार्गावर श्रमदान करत स्वच्छतेचे काम केले.
या सर्व भक्त परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिर्डी येथे 13 मार्च 20 22 रविवार रोजी शिर्डी, तीर्थक्षेत्र महा परिक्रमेचे आयोजन करण्यात आले असून देश विदेशातील लाखोंच्या संख्येने साईभक्त या महा परिक्रमेसाठी शिर्डीत येऊन ही महा परिक्रमा पूर्ण करणार आहे.
अशा या पवित्र महापरीक्रमे साठी हजारो नव्हे लाखो साईभक्तांचे पाऊल शिर्डी तीर्थक्षेत्री लागणार असून अशा या महान परिक्रमेच्या मार्गावर जय बाबाजी भक्त परिवार शिर्डी यांच्या वतीने राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने व त्यांचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या आदेशाने आज शुक्रवार रोजी दिवसभर या शिर्डीतील फक्त 7 परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिर्डी येथील श्री खंडोबा मंदिरा पासून तर कचरा डेपो पर्यंत या महामार्गावर श्रमदान करत साफसफाई केली. स्वच्छता करत हा महा परिक्रमामार्गावर चालणाऱ्या साई भक्तांना चालण्यासाठी व्यवस्थित करण्यात आला. अनेक साईभक्त यामहा परिक्रमेत अनवाणी चालत असतात .अशा साईभक्तांना त्रास होऊ नये म्हणून या संत जनार्दन स्वामी भक्त परिवाराने येथे श्रमदान करत साफसफाई स्वच्छता केली.
हा उपक्रम राबवण्यासाठी रवींद्र शेळके, यशवंत गायके, तुळशीराम कथले, ज्ञानेश्वर चोळके, सिंधुताई कथले, उषा चोळके, मयूर चोळके, साईनाथ कोते, पाराजी पोखले, अरुण भवर, डॉक्टर बाबुराव गांगुर्डे, रत्नाकर वाकचौरे, पोपट वाणी, किरण शेळके, भाऊराव अहिरे, आदींसह या सर्व भक्त परिवाराने त्यासाठी मोठे परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल या सर्वांचे अभिनंदन होत आहे. कौतुक होत आहे.

