प्रतिनिधी : किशोर चाकोते
गुंडेगाव : १५ / राज्यातील जवळपास १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांची आज मंगळवारपासून (ता.१५ मार्च ) दहावीची बोर्डाची लेखी परीक्षा सुरू झाली आहे.
न्यु इग्लिश स्कूल गुंडेगाव हायस्कूल येथे सुद्धा दहावीची परीक्षा सुरू झाली आहे . यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याने, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे अशी माहिती न्यु इग्लिश स्कूल गुंडेगाव हायस्कूल च्या मुख्याध्यापिका श्रीमती पी.डी. नेहूल यांनी माहिती दिली आहे.
त्यामुळे कोणतीही भिती न बाळगता, मानसिक दडपण न घेता विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षा द्यावी, असे आवाहन गुंडेगावाचे उपसंरपच संतोष भापकर, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष खंडू भिसे, दहावी परीक्षा दक्षता समितीचे सदस्य सतिश चौधरी यांनी केले आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रनिहाय नियोजन केले असून, केंद्रांवर केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक सुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्र प्रमुख श्रीमती पी.डी. नेहूल यांनी दिली यावेळी शिक्षक परशुराम साबळे,गुंड सर, संजय भापकर सह अदि ग्रांमस्थ व शिक्षक उपस्थितीत होते.

