shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतीक महिला दिनानिमित्त रूई धारूर येथे आशा ताईंचा सत्कार..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :- 
किल्ले धारूर   तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रूई धारूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद बीड यांच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
      

या बैठकीसाठी डॅा.अमोल गित्ते जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांच्या आदेशावरून डॅा.रौफ शेख अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी आढावा बैठक घेतली.
    
बैठकीसाठी ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ गांजपूर चे सचिव प्रा.ईश्वर मुंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॅा.लोमटे,रूई धारूर  येथील आरोग्य अधिकारी डॅा.पवार,डॅा.कु.मुंडे,भोगलवाडी चे डॅा.मुंडे यांच्या सह ईतर कर्मचारी व आशा वर्कर्स उपस्थित होत्या.
    
या बैठकीत सर्व आरोग्य सेवांचा आढावा घेवून मार्गदर्शन करण्यात आले.
    
मागील वर्षात कामाच्या आधारीत मोबदल्याच्या निकषानिसार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 
 प्रतिभा खाडप-मोहखेड,अनिता कांबळे -शिक्षक कॅालनी धारूर,पार्वती मुंडे -भोगलवाडी,दिपाली मुंडे- कोयाळ यांचा शाल,श्रीफळ व पुष्प गुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
close