राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. ८-३-२०२२
घरेलू कामगार महामंडळ पुनर्जीवित करून सामाजिक सुरक्षा प्रदान करणेबाबत ८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन अहमदनगर यांच्यावतीने मान. सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार आयुक्त कार्यालय, अहमदनगर आणि महिला बाल कल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद अहमदनगर या वरिष्ठ कार्यालयांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
तसेच मान. नायब तहसीलदार दडींले मॅडम यांना प्रत्यक्ष लेखी निवेदन देऊन तात्काळ कल्याण बोर्ड कार्यालयाला आमच्या हक्कासंदर्भात दखल घेण्याबाबत प्रत्यक्ष निवेदन देऊन चर्चा केली आहे. तसेच महीला बाल कल्याण विभाग मान. मुठे साहेब, प्रकल्प अधिकारी पंचायत समिती कार्यालय, राहुरी यांना प्रत्यक्ष कार्यालयात निवेदन दिले आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या आहेत कि १) घरेलु कल्याणकारी मंडळाला विशेष निधीचे प्रावधान करण्यात यावे.२) २०११ ते डिसेंबर २०२१ पर्यंतच्या सगळ्या घरेलू कामगारांना कोविड काळात घोषित केलेली रक्कम ज्यांना निधी मिळाला नाही त्यांना त्वरित मिळावी.३) संत जनाबाई योजना इतर योजना आणि नियमन त्वरित जाहीर कराववीत.४) हायकोर्टच्या आदेशानुसार तात्काळ मंडळाच्या त्रिपक्षीय बोर्डची स्थापना करावी.५) प्रत्येक घरेलू कामगारांचे सर्वेक्षण राज्यस्तरावर धडक मोहीम राबविण्यात याव्यात.६) ६० वर्षाच्या वरील घरेलू कामगारांना विमा योजना लागू कराव्यात.७) नोंदणीसाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्यात यावेत.८) घरेलू कामगारांना नोंदणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देण्यात यावेत.
अशा प्रमुख मागण्या लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन अहमदनगरच्या वतीने संबंधित प्रशासकीय कार्यालयास जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात आले आहे, निवेदन देण्यासाठी जिल्हा समन्वयक संदीप कोकाटे महाराष्ट्र राज्य कामगार युनियन सचिव वर्षाताई बाचकर जिल्हाध्यक्ष सुवर्णा जगधने, तालुकाध्यक्ष बेबीताई शिंदे, घरकामगार युनियन महीला चंदाबाई उबदे, लीला जंगम, राधाबाई गुंजाळ, पोशाबाई हिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन जगधने व सचिन जाधव यांनी प्रत्यक्ष प्रशासनास लेखी निवेदन देऊन न्याय देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेल्या घरकामगार महिलांना गुलाबपुष्प देऊन महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले.

