ऑक्सीजन मशीन व ऑक्सीमीटरचे वाटप
श्रीरामपूर (शौकतभाई शेख):- इंडियन रेड क्रॉस सोसायटी सब डिस्ट्रिक्ट शाखा श्रीरामपूर शाखेला राज्य शाखेने दिलेल्या जीवन रक्षक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
तालुका गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांचे शुभहस्ते रुग्णवाहिकेचे उदघाटन झाले, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अविनाश आपटे,डॉ. दिलीप शिरसाठ,डॉ.रवींद्र जगधने, के.के.आव्हाड, रमेश लोढा, हनुमान मंदिर ट्रस्ट अध्यक्ष मनोज पोरवाल,तालुका आरोग्याधिकारी
डॉ. राजश्री देशमुख,मर्चंट असोसिएशनचे संचालक सुनील गुप्ता,बाळासाहेब खाबिया,बाजार कमिटी संचालक जितेंद्र गदिया, माजी नगरसेवक कल्याण कुंकुलोळ,लोकेश लोढा,विलास लोढा,वैभव लोढ,शहर पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, तालुका पोलिस उपनिरीक्षक अतुल बोरसे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश गोरे,सतीश कुंकुलोळ , पो. हे.कॉ. चांद पठाण,पो.हे.कॉ. अनिल शेंगाळे,पो.हे.कॉ.बिरप्पा करमल आदी मान्यवर उपस्थित होते.त्यानंतर साखर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर यांना ऑक्सिंजन मशीन देण्यात आले. तर ऑक्सि व पल्स मीटर चे विविध वसतिगृहे, शाळा, कॉलेज,दवाखाने यांना वाटप करण्यात आले.
प्रमुख अतिथी रमेश लोढा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जिल्ह्यातील कुपोषित बालक व गरोदर महिलांसाठी सकस आहार योजना सुरू करणार असल्याचे सांगितले या कार्यामध्ये रेड क्रॉस ची भूमिका महत्त्वाची असून त्यांना बरोबर घेऊन मोहीम राबविणार असल्याचे रमेश लोढा यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटक गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी रेड क्रोस सोसायटी चे जागतिक कार्याचा उल्लेख करताना सांगितले आंतरराष्ट्रीय स्थरावर शांतता व मानवी सुरक्षेचे सर्वात महान कार्य रेड क्रॉस करते, देशपातळीवरील रेड क्रॉस सोसायटी चे शासनाला प्रत्येक कामात मदत होत असते.
प्रास्तविक व स्वागत रेड क्रॉस चे सचिव सुनील साळवे यांनी तर आभार प्रवीण साळवे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुनील साळवे, प्रवीण साळवे,पोपटराव शेळके, सागर जावळे,विनीत कुंकुळोल, सुरेश वाघुले,किरण सोनवणे, सागर गिरनारे,श्रावण भोसले, लहानू त्रिभुवन, प्रा. डॉ. शैलेश भणगे,संतोष जाधव, सुखदेव शेरे, डॉ.बाळासाहेब सोनटक्के, दिलीप महाजनी,साहेबराव रक्टे, सुरेश शेंडे,देविदास दळवी,प्रमोद पत्की,सौ.पुष्पा शिंदे ,सौ.लता शेळके,प्रा.सुप्रिया साळवे,शोभा शेंडगे,सविता साळुंके,वर्षा दातीर, माया चाबुकस्वार व कु.वैष्णवी वाडकर,अश्विनी लीप्टे, युवा रेड क्रॉस सोसायटीचे सर्व सदस्य आदींनी परिश्रम घेतले.

