अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबीर संपन्न..!
धामणगाव रेल्वे - आज दि.22/03/2022 रोजी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक अमरावती आयोजित अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबीर ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे संपन्न झाले सदर शिबिरात 5 अंडवृद्धी रुग्णांवर डॉ.राऊत सर व सहकाऱ्यांनी शस्त्रक्रिया केली हे शिबीर सहायक संचालक डॉ.भंडारी सर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निरवाने सर,वैद्यकीय अधिक्षक डॉ.साबळे सर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.जोगी सर जिल्हा हिवताप सहायक अधिकारी मुंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
*अमरावती जिल्हा हत्तीरोग व अंडवृद्धी मुक्त करण्यासाठी ज्यांनी विडा उचलला आहे व ज्यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यात अंडवृद्धी शिबिराचा धडाका लागला आहे असे जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर यांनी शिबिराला प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या* तसेच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रवीण चकुले,आरोग्य सहायक सुधाकर चोपकर,आरोग्य कर्मचारी प्रकाश दातीर उपस्थित होते.
या अंडवृद्धी रुग्णांना प्रोत्साहित करून तसेच आरोग्य शिक्षण देऊन व शिबीर यशस्वी करण्यासाठी धामणगाव रेल्वे व तळेगाव दशासर उपपथकातील कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली यामध्ये आरोग्य सहायक सुधाकर चोपकर,मोहन तायडे,आर.टी.दुधकवरे आरोग्य कर्मचारी भोयर,खांडरे,बाविस्कर,भोसले तसेच क्षेत्र कर्मचारी उईके,गावंडे हे होते. *तसेच ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथील सर्व वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी,आरोग्य सेविका व संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले व अंडवृद्धी शिबीर यशस्वीपणे पार पडले.

