शाळा पुर्व तयारी बाबतचे व्याहाळी केंद्राचे केंद्रस्तरीय प्रशिक्षण संपन्न.
शाळा पूर्व तयारी प्रशिक्षणातील मेळाव्यामुळे पट व गुणवत्ता वाढणार - संभाजी आजबे(केंद्रप्रमुख).
इंदापूर प्रतिनिधी: दि २४. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे मार्फत आयोजित शिक्षकांचे नवीन शैक्षणीक वर्षात पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांसाठी शाळा पूर्व तयारी बाबतचे प्रशिक्षण जि प प्राथमिक शाळा व्याहाळी येथे पार पडले.
व्याहाळी केंद्रातील अंगणवाडी ताईंच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांनी प्रास्ताविक केले.सुलभक बापूराव जाधव व राजकुमार भोंग सरांनी मेळावा घेण्याविषयी माहिती दिली.मेळावे किती व कसे घ्यावेत याचे प्रात्यक्षिक घेवुन मार्गदर्शन केले. सर्व शिक्षकांनी व अंगणवाडी ताईंनी उत्स्फुर्तपणे प्रशिक्षणाच्या कृतींमध्ये भाग घेतला.प्रशिक्षणाची तयारी सुलभक व व्याहाळी शाळेतील शिक्षकांनी केली.या प्रशिक्षणासाठी व्याहाळी केंद्रातील सर्व शिक्षक व अंगणवाडीताई उपस्थित होत्या.प्रशिक्षणातील सर्व शिक्षकांना चहा,नाश्त्याची सोय व्याहाळी शाळेच्या वतीने करण्यात आली. आभार चंद्रकांत रामाने यांनी मानले.

