shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रश्नावर आधारित राजकारणच खरा विकास करते, जथे व सोयरे धायरे धार्जिणे राजकारण टाळा - दत्ता कडू पाटील...!


देवळाली प्रवरा - दि. २८ फेब्रुवारी
माजी सनदी अधिकारी दत्ता कडू यांनी आज त्यांचे फेसबुक पेजवर गावगाडा लिहताना म्हंटले की प्रश्नावर आधारित राजकारणच खरा विकास करते, जथे व सोयरे धायरे धार्जिणे राजकारण टाळा.. 

          गावगड्यात ते लिहतात की, आज गांवगाडा नेहमीप्रमाणे सुरु झाला.निवडणुकीची चाहुल लागल्याने हालचालींना काहीसा वेग आला आहे.पक्षीय बैठका उघड न् छुप्या सुरु झाल्या आहेत.आपले शहरांत अंतर्गत सायफन असल्याने नेमका कोण कसा ऐनवेळी इकडे तिकडे फिरेल याचा नेम नाही.आघाडी विरुध्द सत्तारुढ भाजपा असा सामना रंगेल असे चित्र आहे.क्रॅाग्रेस राष्ट्रवादी यांची नैर्सगीक आघाडी असल्याने तसेच त्यांच्या शहराबाहेरिल श्रेष्ठीचा चांगला समन्वय असल्याने त्यांच्यात समन्वय राहिल.यात आघाडीच्या पक्षाचा तिसरा मित्र शिवसेना यांचाहि कल आघाडीकडे आहे.परंतु एकंदरीत चर्चेतून क्रॅाग्रेस न् राष्ट्रवादी शिवसेना पक्षाला बरोबरीचा जागा वाटपात वाटा देईल कि नाही याबाबत शंका बोलुन दाखवत आहेत.परंतु मा मुख्यमंत्र्यानी कोरोनाकाळात केलेले काम न् आतापर्यतचा संयमी कारभार पहाता जनमानसांत शिवसेना पक्षाविषयी आस्था आहे.त्यांना वजा करुन आघाडी बनवण्याचा अव्यवहार्यीपणा राष्टृवादी व कॅाग्रेसचे नेते करणार नाहीत.हे तितकेच खरे. 
          गावांत रिपाई तसेच इतर काही वजनदार नेत्यांची भुमीका या निवडणुकीत महत्वाची आहे.राज्यातील पक्षातील आघाड्या युती पहाता हे घटक सत्तारुढ भाजपाशी संलग्न आहेत स्थानीक स्तरावर भाजपाविरोधी यांची भुमीका दिसते आहे.त्यांना त्यांचे नेतृत्वाकडुन जुळवुन घेण्याचा दबाव वा मुक्तपणे त्यांना वाटेल तो निर्णय घेण्याचा मोकळीक यापैकी जे घडेल यावरच त्यांची निवडणुकीतील भुमीका ठरेल.या घटकांचा निवडणुकीत जिकडे पाठींबा राहिल तिकडे सत्तेचा तराजु झुकेल हे तितकेच खरे. 

            शहरांत इतरही काही नवीन पक्षांचे आगमन झाले आहे.वंचीत बहुजन आघाडी ,मनसे प्रहार जनशक्ती पक्ष त्यात प्रमुख आहेत.सत्तारुढ व आघाडीचे पक्ष सध्या त्यांचे अस्तित्व नगण्य मानत असले तरी २००-३०० मते सहज इकडे तिकडे करण्याची क्षमता या पक्षांत नक्कीच आहे. त्यात वंचीत न् प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष पद आपले शहरात आले आहे. मा प्रकाश आंबेडकर यांची बहुजनविकासाची संकल्पना तसेच प्रहारचे राज्यमंत्री मा बच्चु कडु यांची रोखठोक भुमीका सोशल मिडियातुन आम जनतेत पोहचली आहे. तसेच मनसे पक्षाचे राहुरी कारखान्यावरिल अस्तीत्वही दखल घेण्याजोगे आहे. तेथील तरुण पक्षाचे काम चांगल्या प्रकारे करताना दिसत आहे.या पक्षाला आघाडी वा भाजपा सोबत नक्कीच घेणार नाहीत परंतु यांचे उपद्रव्यमुल्य कुणाला न् कुणाला तापदायक ठरणार आहे.  
          
           आता तुमचा प्रश्न आमचेबाबतीत असेल तुमची भुमीका काय. मध्यतंरी आम्ही सत्तारुढ भाजपा सोडुन सर्वाशी भेट घेत विरोधकांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले.परंतु त्यांस आमच्या प्रयत्नांना यश आले नाही.कदाचित आमच्याबाबतीत कोण हा आंगतुक उगवला अशीहि असेल.समोर सकारात्मक भुमीका घ्यायची नंतर पाठीमागे अगदी त्याविरुध्द.तरिहि अंतर्गत नुरा कुस्तीचा मागील निवडणुकीतील अनुभव पहाता फार काही समीकरणात बदल होईल असे वाटत नाही.त्यात सर्वसाधनसामुग्रीने आघाडी न् सत्तारुढ भाजपा संपन्न आहे.नेमके निवडणूकीच्या महिनाभराच्या कालावधीत काय हवे याचे त्यांना पुर्ण आकलन आहे.तुम्हीहि त्याच मार्गाने गेलात न् गेल्या निवडणुकीतील नुरा कुस्ती पहाता फार बदल होणार नाही.आम्ही मुळचेच शिवसेनाप्रेमी  आहोत. गेली निवडणुक पक्षाचे वतीने लढवलेली आमच्या कुटुंबांनी.तेंव्हा आम्ही आमचा पक्ष जी भुमीका घेईल त्यासोबत रहाणार आहोत.परंतु एकंदरीत गावाचा मुड पहाता राजकिय खुप मोठी पोकळी आहे.त्या पोकळीत वंचीत न् मनसे तसेच प्रहार जनशक्ती आपले अस्तीत्व नक्की दाखवणार हे मात्र नक्की. कारण हेच पक्ष गोरगरिब न् सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत १२ महिने चोवीस तास सक्रिय रहातात. केवळ निवडणुकीपुरते त्यांचे राजकारण नसते.जरी यश नाही मिळाले तरी पुढचा पाया ते नक्की घालतील.प्रश्नांवर आधारित राजकारण या गावांत जेव्हा होईल तेव्हाच खरा विकास होईल. नाहीतर तुमचे जथ्थे तुम्हांला तिथेच अडकुन ठेवतील. पहा. तुम्हीच आता
"गांवगाडा"
close