पुर्णा(प्रतिनिधी ) :- येथील रेल्वे इन्स्टीट्युटच्या कार्यकारी मंडळाच्या झालेल्या निवडणुकित रेल्वे एम्लाइज संघाने कांचन ठाकुर यांच्या नेतुत्वाखाली सर्वच्या सर्व जागा निवडुन आणुन तब्बल पंधरा वर्षा नंतर एम्लाइज संघाचा एकमुखी झेंडा फडकविला आहे.
मागील कार्यकारी मंडळाचा कालावधी उलटुन बराच काळ लोटला परंतु कोरोना महामारीमुळे हि निवडणुक लांबणीवर पडली.होती.दि.17मार्च2022रोजी सकाळी मतदान सुरु झाले सांयकाळी मतदाना नंतर लगेच मत मोजणी सुरु झाली.या वेळी609मतदारापैकी 478 मतदारानी आपल्या मताचा हक्क बजावला त्या मध्ये सचिवपदी स्वता;कांचन ठाकुर यांनी 253मते घेतली व सहसचिवपदी महादेव शिंदे यांनी 207 मते मिळविली.
कोषाध्यक्षपदी एम. विजयभास्कर यांनी 227 मते प्राप्त केली याशिवाय कार्यकारी मंडळात सदस्यपदी विजयकुमार बुध्दे.मुकेश मीना. संतोष साळवे. शेख आशशरफ. संदीप वाव्हळे. पप्पुकुमार याचाही भरघोश मताने विजयी झाला या निवडणुकित एकुण चार पॕनाल उभे होते .त्यामध्ये अंत्यत चुरशीची लढत रेल्वे मजदुर युनियुन व रेल्वे एम्लाइज संंघात झाली आॕल इंडिया एसी व एस.टी. रेल्वे संघटनेचे सुरेंर्दकुमार याना केवळ 31मतावरच (एकतीस)मतावरच समाधान मानावे लागले. गेल्या पंधरा वर्षा पासुन रेल्वे मजदुर युनियनच्या ताब्यात असलेले रेल्वे इन्स्टीट्युट हे कांचन ठाकुर यांनी मोठ्या हिमतीने लढत दिली राञी एक वाजे पर्यत मतमोजणी सुरु होती या कामी एडिएन सुधाकर मलदोडे.चंद्रपाल राजभोज.
रेल्वे शाळेचे शिक्षक धोपेसर.अन्वरसर. राऊतसर. तांदळेसर. शिवाय रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आदीनी मोलाची कामगिरी बजावली .रेल्वे एम्लाईज संघाचे पॕनाल निवडुन आणण्यासाठी प्रकाश हटकर. राजेश शिंदे .एन. जेसवा. सारीपुत सोनवणे. सिध्दार्थ गायकवाड . महेद् एंगडे. संघरत्न सांवत. चंद्रशेखर जोगदंड. रमेश मुगदल. सागर अहिरे. धनराज मीना. अमोल दवणे. डेव्हिड दाभाडे. धम्मा खरे. राहुल धुळे आदीनी परिश्रम घेतले.

