राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. १९-३-२०२२
वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि साहित्य प्रबोधन मंचतर्फे लॉकडाऊन /टाळेबंदी विषयावर आधारित कवितांचा संपादन कवितासंग्रह लवकरच प्रकाशित होत असून त्यासाठी स्फूट कविता पाठविण्याचे आवाहन डॉ. बाबुराव उपाध्ये आणि डॉ.शिवाजी काळे यांनी केले आहे.
या कवितांची निवड कोल्हापूर येथील माजी प्राचार्य डॉ.प्रकाश कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार होणार आहे.
कोविड १९ ने जगभर भयावह परिस्थिती निर्माण केली आहे.मार्च २०२० पासून भारतात जनता कर्फ्यु ,लॉकडाऊन, जमावबंदी,संचारबंदी आदींच्या माध्यमातून माणसाचे गतिशील जीवन स्थितिशील झाले.जगणे महाग झाले.घरात बसणे आले. माणूस अनेक अंगाने हतबल झाला,कवी,लेखकांच्या प्रतिभेला शब्दांचे धुमारे फुटले ,अशा जगण्याचा,मरणाचा प्रवास करणारे मानवी जग कवितेच्या रूपाने आविष्कृत झाले.
अशा मोजक्या,दर्जेदार आणि आशयसंपन्न कवितांचे संपादन पुस्तक रूपाने येत आहे.आपण आपली एकच अर्थपूर्ण कविता डॉ.शिवाजी काळे यांच्या ९९६०६०७६३३ या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा
डॉ. शिवाजी काळे , ४२ ,आसरा गुरुनानकनगर,वार्ड नं. १, गोंधवणीरोड श्रीरामपूर - ४१३७०९,जि. अहमदनगर या पत्यावर दि .३१ मार्च २०२२ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे.

