shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला टाळे ठोकण्याचा काकडी ग्रामपंचायतचा इशारा..!


शिर्डी । प्रतिनिधी :- शिर्डी विमानतळ हे जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 
येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे (MADC) काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायतची करापोटीची थकबाकी असलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम प्राधिकरणाकडून ग्रामपंचायतला तात्काळ न मिळाल्यास तसेच विमानतळावर नोकरभरती करताना स्थानिकांना प्रथम प्राधान्य न दिल्यास, एअरपोर्ट डायरेक्टरच्या ऑफिसला तसेच शिर्डी विमानतळाच्या गेटला काकडी ग्रामपंचायतच्या वतीने लवकरच टाळं ठोकू अशा इशाऱ्याचे निवेदन काकडी ग्रामस्थांच्या वतीनं शिर्डी विमानतळ व्यवस्थापक सुशीलकुमार श्रीवास्तव यांना दिलंय.

गाव आजपर्यंत वंचित
ज्या विमानतळासाठी गावाने १५०० एकर जमिनीचा त्याग केला तेच गाव आज पर्यंत वंचित आहे. गाव स्मार्ट सिटी करू व गावातील तरुणांना कायमस्वरूपी नोकऱ्या देऊ असली खोटी आश्वासने महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने गावकऱ्यांना देऊन गावाची मोठी फसवणूक केली आहे. विमानतळ होऊन कित्येक वर्षे उलटली परंतु आजही गावात शाळा, रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट सह कित्येक प्रश्न प्रलंबित आहे. गावातील बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्राधिकरणाने निवेदनाची लवकर दखल घ्यावी अन्यथा शिर्डी विमानतळाला टाळं ठोकू असं ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला.


close