shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आईसह ३ लेकरांचा विहिरीत आढळला मृतदेह !! मन सुन्न करणारी घटना..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०६ मार्च २०२२

विहिरीत आढळले आईसह दोन मुलींचे व एका चिमुकल्याचा मृतदेह..!!

कोठे खुर्दच्या खांडगेदरा येथील घटना; गावावर पसरली शोककळा... पठार भागातील नागरिकांनी हळहळ केली व्यक्त..!!


संगमनेर : तालुक्याच्या पठारभागातील कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथील विहीरीत आईसह दोन मुली व एका चिमुकल्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे ही घटना शुक्रवार ता.४ मार्च दुपारी उघडकीस आली आहे.या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
         याबाबत समजलेली माहिती अशी की कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथे बाळासाहेब गणपत ढोकरे, पत्नी स्वाती बाळासाहेब ढोकरे, मुलगी भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे, माधुरी बाळासाहेब ढोकरे व चिमुकला मुलगा शिवम बाळासाहेब ढोकरे हे सर्वजण राहत आहे. घराशेजारीच असलेल्या विहिरीत स्वाती ढोकरे, भाग्यश्री ढोकरे, माधुरी ढोकरे व चिमुकला मुलगा शिवम यांचे मृतदेह आढळून आल्याने घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
 
       त्यानंतर चारीही मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आले आहे . घटनेची माहिती घारगाव पोलीसांना देण्यात आली माहिती समजताच पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, संतोष खैरे या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली व खासगी रूग्णवाहीकेला बोलावून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात पाठवण्यात आले आहे या घटनेने खांडगेदरा व कोठे खुर्द गावावर शोककळा पसरली असून पठार भागातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600




close