shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोरगांवच्या भुमीत आदर्श हिऱ्यांची खाण....!

भास्कर  कांबळे(सर) आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित..!! 

प्रकाश मुंडे  |  बीड जिल्हा प्रतिनिधि  :-
केज तालुक्यातील बोरगांव (बु) हे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शैक्षणिक ,वैचारिक ,साहित्यिक वारसा जपणारे गांव...पुर्वीचे प्रा.सुंदरराव गव्हाणे पासुन ते लातुरच्या शाहु कॉलेजचे प्राचार्य महादेवराव गव्हाणे ...जिल्हाधिकारी गव्हाणे ते आजचे त्याच भुमीत रुजलेले साहित्यिक अनिल गव्हाणे ,कवीवर्य संदिप कांबळे ,आदर्श शिक्षक भास्कर कांबळे...
 भास्कर कांबळे (सर) हे गेल्या वीस वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्य़ात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत..


सध्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. आपल्या वीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक  विद्यार्थी घडवले आहेत. 
आदर्श, शिस्तप्रिय आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून
त्यांची जिल्ह्य़ात ओळख आहे.


उस्मानाबाद जिल्ह्य़ातील अवधूतवाडी, आढाळा, कळंब, भोंजा ता.परंडा या गावांतील शाळेत सेवा करून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.. या पूर्वी शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये पंचायत समिती परंडा यांनीही त्यांना  आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे.


त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन 
पंचायत समिती कळंब यांनी शैक्षणिक वर्ष २०२१ - २०२२ चा आदर्श शिक्षक पुरस्कार  उस्मानाबादचे आमदार श्री कैलास पाटील आणि खासदार श्री ओमराजे निंबाळकर  त्यांचा हस्ते देऊन गौरव केला आहे.. 
हा पुरस्कार वितरण सोहळा ५/३/२०२२ रोजी मोहेकर महाविद्यालय कळंब येथे मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. 
या प्रसंगी पंचायत समिती कळंबच्या सभापती सौ. संगिताताई वाघे, उपसभापती गुणवंत (बप्पा) प विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तालुक्यातील अनेक शिक्षणप्रेमी नागरीक व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. 
पुढील शैक्षणिक कार्य   अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
close