shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

असा लाखाचा पोशिंदा पुन्हा होणे नाही - संजय शिंदे

कोपरगाव ! प्रतिनिधी :
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांना समृध्द शेतक-याबरोबर जिरायती भागातील शेतक-याबददल कमालीची आपुलकी होती, त्यांचे प्रश्न ते पोटतिडकीने सोडवित त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राचा वाली हरपला, असा लाखाचा पोशिंदा पुन्हा होणे नाही अशा शब्दात प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाकार्याध्यक्ष संजय शिंदे व कृष्णा भिंगारे यांनी श्रध्दांजली वाहिली.


शंकरराव कोल्हे यांच्या वस्तीवर  सांत्वनपर भेट दिली.
या प्रसंगी संजय शिंदे  यांनी माजी मंत्री कै.कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा देत पुढे बोलताना सांगितले की, माजी मंत्री कोल्हे यांनी सहकार, शेती , शिक्षण अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांचा कार्याची इतिहासात नक्कीच सुवर्णक्षरांनी नोंद होणार आहे.साहेबानी आपल्या दूरदृष्टीने प्रत्येक गावात पाण्याचा उपलब्धतेसाठी मोठ्या प्रमाणात बंधारे बांधली त्यामुळे नक्कीच सर्व गावे पाण्याचा बाबतीत सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली आहे. 

संपूर्ण राज्यात पाणी प्रश्ना साठी आणि शेतकऱ्यांसाठी रिझर्व्ह बँकेवर मोर्चा नेणारे सत्याग्रही आंदोलक हे कोल्हे एकमेव होते. त्यांचा जाण्याने कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील जणू एक  कुटुंब प्रमुख हरपल्याची भावना प्रहार जनशक्ति पार्टी चे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी व्यक्त केली.
close