shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाग्यश्री विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित पिठेवाडी च्या चेअरमन पदी प्रदीप चोरमले तर व्हा. चेअरमन पदी संतोष जाधव यांची निवड.

भाग्यश्री विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित पिठेवाडी च्या चेअरमन पदी प्रदीप चोरमले तर व्हा. चेअरमन पदी संतोष जाधव यांची निवड.

सोसायटीच्या संचालक मंडळात युवकांना संधी
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील पिठेवाडी येथे भाग्यश्री विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक नुकतीच पार पडली. या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची निवडणूक आज निवडणूक निर्णय अधिकारी एस एस कदम मॅडम यांनी पार पाडली असून यावेळी चेअरमन पदी प्रदिप महादेव चोरमले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी संतोष कोंडीबा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 यावेळी भाग्यश्री विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक महादेव ज्ञानदेव शेंडगे, सुखदेव तुकाराम मासाळ,  दादासो महादेव व्हनकडे, दादासो एकनाथ शेंडगे, उमेश संपत कुंभार,भाऊ ज्योतीराम मदने, प्रमोद विष्णू वाघमोडे ,चंद्रकांत बापूराव वाघमोडे, सौरभ आप्पासो बुरुंगले, श्रीमती रुक्मिणी किसन बंडगर, सौ माया विजय गाढवे व सचिव श्रीमंत वाघमोडे उपस्थित होते. तसेच बापूराव बंडगर, विष्णू वाघमोडे, बापूराव चोरमले, बापूराव किसन वाघमोडे, देविदास बुरुंगले, विजय गाढवे, चंद्रकांत कचरे, सुभाष कचरे, रामचंद्र मासाळ, गोरख मासाळ, प्रशांत बुरुंगले व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भाग्यश्री विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्याची माहिती सोसायटीचे सचिव श्रीमंत वाघमोडे यांनी दिली.
close