मध्यान्ह भोजन योजनेस १०० % अनुदानाची तरतुद करण्यात यावी... राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री ना. श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या नावे इंदापूर तहसीलदार यांच्याकडे दिले निवेदन पत्र.
इंदापूर प्रतिनिधी: मध्यान्ह भोजन योजनेतील अनुदानात १०० % वाढ करण्यात यावी म्हणून ना . श्रीमती निर्मला सीतारमन अर्थमंत्री , भारत सरकार यांना राष्ट्रसेवा दला चे निवेदन पाठविण्यात आले, त्या निवेदनाची प्रत इंदापूरचे तहसीलदार यांना देण्यात आले,या निवेदनात विविध विषय मांडण्यात आले आसल्याची माहीती राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कृष्णाजी ताटे सर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, देशातील शाळा - शाळांमधून मुला - मुलींची उपस्थिती वाढावी , गळती थांबावी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी भारत सरकाने MDM मध्यान्ह भोजन योजना सुरु केलेली आहे . ही योजना आता प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण या नावाने सुरु होत आहे . केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ या अंदाज पत्रकात या योजनेस १०० % अनुदानाची तरतुद केलेली दिसून येत नाही . उलट कपातच झालेली आहे , ही गंभीर बाब आहे . बहुजन , कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील बहुसंख्य मुलं या योजनेमुळे शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत . मात्र अनुदानात कपात झाल्याने ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाण्याचा धोका निर्माण होतो . तसेच महाराष्ट्रातील आश्रम शाळा अनुदानित वसतिगृहे यांच्यासाठी नारी निकेतन योजनेअंतर्गत गहू , तांदूळ शासनाकडून मिळत होता तो , ई मशीन च्या नावाखाली बंद आहे . तो पूर्ववत चालू करावा . तरी कृपया प्रधानमंत्र्यांच्या नावाने सुरु होत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेस १०० % अनुदानाची तरतुद करण्यात यावी,आशी मागणी राष्ट्रसेवादलाच्या वतीने करण्यात आली, या वेळी सेवादल मंडळ सदस्य कृष्णाजी ताटे सर,मार्गदर्शक साथी सलिम शेख, राष्ट्र सेवा दल राज्य कार्यकारिणी सदस्य गफूरभाई सय्यद,जिल्हा कोशाध्यक्ष बिभीषण लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश शिंदे,उपस्थित होतेे
.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संघटक शिवाजीराव मुखरे, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ, वंचित बहुजन आघाडीचे हनुमंतराव कांबळे,सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, मौर्य क्रांती संघ शहराध्यक्ष प्रकाश पवार यास
इतर मान्यवर उपस्थित होते.

