हिवरे बाजार :- नगर तालुक्यातील हिवरे बाजार गावच्या गिरी महाराजच्या परिसरात असणाऱ्या डोंगराला आज आग लागली. गावकऱ्यांना आग लागल्याची माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत देण्यात आली. गावातील शंभर- दीडशे तरुणांनी डोंगराकडे धाव घेत आग विझवली. या तरुणांनी पाठीवर असणारे शेती पंचाच्या मदतीने, पोत्याच्या साह्याने झाडांच्या फांद्यांनी ही आग विझवली. आग विझवण्यासाठी जवळपास दोन -अडीच तास लागले.
गावातील यंत्रणा तातडीने सज्ज
काल रात्री दैठणे गुंजाळ येथील डोंगराला आग लागली होती. मात्र हा भाग आडबाजुला असल्यामुळे आग लागलेली समजली नाही. सकाळपर्यंत ही आग हिवरे बाजार येथील गिरी महाराज डोंगराच्या पाठीमागील बाजूपर्यंत पोहोचली होती. डोंगर परिसरातून येणाऱ्या धुरामुळे आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर ग्राम यंत्रणा आग विझवण्यासाठी कार्यरत झाली.

