shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ३१ मार्च १९९० रोजी भारतरत्न प्रदान करण्यात आला...!



जय भीम.. ! नमो बुद्धाय..!!

आजची तारीख फक्त इतर कोणत्याही दिवसाची नाही, तर ती राष्ट्रासाठी अधिक महत्त्वाची आहे. आजच्याच दिवशी तीन दशकांपूर्वी भीमराव रामजी आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते.

 डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. भीमराव आंबेडकर यांनी सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवून दिला. आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले. अशा  निस्वार्थी जगत्गुरुनेत्याला शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह परिवाराचे वतीने मानाचा मुजरा..!👏🌹
close