महाराज ..
जिजाऊला पुत्र हवा
स्वराज्य स्थापनार्थ
आशीर्वाद जगदंबेचा
अगदी ठरला सार्थ
मोठाल्या विभूतीचा
असा असतो स्वार्थ
समर्पित आयु अवघे
त्यात केवळ परमार्थ
शिवराय जन्मोत्सव
शिवनेरी झाले तीर्थ
स्वराज्यस्वप्न सत्यात
मराठी मातीला अर्थ
मोगलाईचा पोटशूळ
विरोध विफल अनर्थ
मावळ्याचे बलीदान
मुळीचं ना गेले व्यर्थ
असा न हो राजादुजा
छत्रपती असे समर्थ
जिजाऊचा पुत्रलाभ
असा समाजा प्रित्यर्थ
भगवा राहो फडकत
हवी प्रयत्नांची शर्थ
आचरणी शिवचरित्र
तेव्हाचं खरोखर अर्थ
2)
अंश ..
शिव छत्रपती चरित्र
आचरणात आणता
होईल प्रसन्न खरा
तेव्हा राजा जाणता
वाढवा स्मारक उंची
मन मात्र नको खुजे
राष्ट्रप्रेम रोमा रोमात
प्रसन्न होतील राजे
नको असे हीनधोरण
मतांस्तव राजकारण
छत्रपती राहती तिथे
जे स्वच्छ अंतःकरण
ज्यांचे मन रे निरंकार
नाही अहंकार विकार
छत्रपती शिवरायांचा
त्याने करावा जयकार
शिवबा गुणांची खाण
जाणा जागवा अंश
म्हणा खुशाल तेव्हा
छत्रपतींचे आम्ही वंश
- हेमंत मुसरीफ पुणे.
९७३०३०६९९६
www.kavyakusum.com

