shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अकोले तालुक्यातील मोबाईल रेंजची समस्या दूर करण्यासाठी टॉवर उभारणी करण्यासाठी चे आदेश दूरसंचार मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांनी दिलेची माहिती शिर्डी चे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी दिली.!


         अकोले तालुका दुर्गम व आदिवासी भाग आहे. डोंगराळ भाग असल्याने बऱ्याच भागात रेंज नसते. अकोले तालुक्यात अनेक पर्यटन स्थळ आहेत. यामुळे अनेक पर्यटक याभागात येतात. मात्र रेंज नसल्याने त्यांचा संपर्क होत नाही. विद्यार्थी रेंज अभावी ऑन लाईन शिक्षण पासून वंचित आहेत. ग्रामपंचायतला आपला कारभार नीट करता येत नाही. तलाठी कार्यालयात जनेतला सात बारा उतारा मिळत नाही. अश्या अनेक समस्या निर्माण होतात. 

         खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी ही गंभीर समस्या दूरसंचार मंत्री यांच्या लक्षात आणून दिली अन अकोले तालुक्यात मोबाईल टॉवर उभारण्यात यावे अशी मागणी केली. त्याला प्रतिसाद देत दूरसंचार मंत्री यांनी याबाबद चौकशी करण्यात येत असून लवकरच टॉवर उभारणी होईल असेही खा. लोखंडे यांनी सांगितले.
close