पुण्यात वडार समाजाचा दुसरा भव्यदिव्य जागतिक महिला दिन -२०२२ मोठ्या उत्साहाने साजरा...!
पुणे । प्रतिनिधी :-
अखिल वडार समाज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, पुणे आयोजित ८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त- वडार नारी सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक कला महोत्सव - २०२२, रविवार दिनांक १३ मार्च २०२२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक, पुणे स्टेशन जवळ, पुणे - ४११०१ येथे नियोजनपूर्वक उत्तम रितीने पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सौ.सुवर्णाताई शिंदे - चौगुले, तुरूंगाधिकारी, अ. नगर, मनोहर बंदपट्टे अवर सचिव, मंत्रालय, मुंबई केले.
तसेच मा. सौ. शारदाताई ओरसे, माजी नगरसेविका पुणे, विशेष उपस्थिती म्हणून मा. श्री. बजरंग चौगुले, डी वाय एस पी - पुणे स्वागताध्यक्षा मा. सौ. संगिताताई धोत्रे माजी नगराध्यक्षा- तळेगाव दाभाडे नगरपरिषद, आणि कार्यक्रम अध्यक्षा मा. सौ. सुनिताताई जाधव - दाते आदर्श शिक्षिका सोलापूर यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्विकृत सदस्या - मा. कु. अपर्णाताई कुराडे, पुणे मा. सौ. सुजाताताई इरकल, पुणे सौ. सुनिताताई जाधव, मुंबई, सौ. मानसीताई वडार, सोलापूर, सौ. सुलोचनाताई विटकर, पुणे, सौ. स्वातीताई कुसाळकर, पूणे, सौ. संगिताताई जाधव, बारामती, श्रीमती पुजाताई भातकर, सातारा ज्योती शिंदे, इ. मान्यवर उपस्थित होते.
विशेष निमंत्रित म्हणून सौ. अनुराधाताई मुधोळकर, श्रीमती. भाग्या रमेश कुमार, बेंगलोर, सौ ललिता धनवटे, डॉ जयश्री ताई अलकुंटे पुणे, सौ सुनिता जाधव नवी मुंबई मा. श्री. दिलीप जाधव सांगली हे उपस्थित होते.
तसेच दुसरं सत्रासाठी कार्यक्रम अध्यक्ष श्री. शामराव पवार, पुणे विशेष उपस्थिती म्हणून श्री. शिवरुद्र स्वामी, बेंगलोर आणि स्वागत अध्यक्ष मा. श्री. टी. एस. चव्हाण, औरंगाबाद आणि विशेष निमंत्रित म्हणून मा. मा. श्री. दयानंद इरकल, मा. श्री. राकेश विटकर आणि पाहुणे म्हणून मा. प्रा. श्री. शशिकांत जाधव, मा. मा. श्री. कोळप्पा धोत्रे, मा. श्री. वरद राजलू , मा. श्री. नरसिंगराव बोडासु इत्यादी मान्यवर उपस्थिती होते.
या कार्यक्रमात नृत्य अविष्कार, मिमिक्री, नक्कला, विनोद, गायन, वाद्य वाजविणे, वडार गीत, कविता सादरीकरण, व्यक्तीरेखा सादरीकरण, एक पात्री नाटक, इत्यादी सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम झाले.सदर कार्यक्रम दमदार, दिमाखदार, अविस्मरणीय, अप्रतिम नारी सांस्कृतिक महोत्सव व सन्मान सोहळा यशस्वीरित्या पार पडला.
वडार समाजातील महिलाचे विविध कलागुण सादरीकरण..
मा. श्रीमति वंदना दिंडे, (पुणे) ह्यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
विशेषत: पाहुण्याचा हस्ते दीप्रज्वलनाने सुरू करून तुळस रोपटे जार ने पाणी ओतून पर्यावरण पूरक संदेश दिले. आणि सत्कार मूर्ती व पुरस्कार देताना ट्रॉफी सोबत बुकी ऐवजी तुळस रोपटे देण्यात आले. त्या तुलशीला आई, सौभाग्यावतीचे लेणे, धार्मिक तर विज्ञान भाषेत कीटक नाशक ऑक्सीजन शिदोरी, म्हटले जाते ही कल्पना सर्वाँना फार आवडले आणि नावीन्य बदल होता आणि हळदी कुंकू कार्यक्रम सुध्दा चालू कार्यक्रमात उरकून घेतले. त्यामुळें वर्षाचा एक दिवस सामाजिक महिला दिन सार्थक वाटले.
दमदार धडाकेबाज अप्रतिम कु. प्रतिक्षा बंडगर (लातूर) व कु मोहिनी देवकर (बार्शी) ह्या मुलीनी मनमोहून टाकणा-या अदा ठसकेबाज कडक लावणी सादरीकरणाने वडार बांधव मंत्रमुग्ध झाले. कथ्थक नृत्य सादर करून कु.श्रेया देवकर (बार्शी) हिचे नृत्य पाहून सर्वांचे मन मोहून गेले, छोट्या ऋतुराज धोत्रे च्या डान्सने आईविना जग कसे असते...? शिकवून गेला तर विशाल पवार पुणे पुणे कॅबरा डान्स उत्तम रितीने सादर केला.
मिमिक्रीचे बादशहा अभिमान विटकर (पुणे) ह्यांनी सर्व हिरोचीं मिमिक्री सादर करून सर्वाना अचंबित केले तर छोटा अभियान विटकर (पुणे) ह्याने मिमिक्री सादर करून वाहवा मिळवली, कल्याण पोवार (अहमदनगर) नी विविध गायकांचे आवाजात गाणी गाऊन उपस्थितांचे मन डोलवले
सौ. सूवर्णा देवकर (बार्शी) ह्या नारीने तर मी सावित्री बोलते हे अप्रतिम असे एकपात्री नाट्य सादर करून उपस्थितांचे डोळे पाणावले तेथेच खऱ्या अर्थाने सावित्री बाई फुले दर्शन घडले तेथेच जागतिक महिला दिनाचे सार्थक झाले. आणि प्रेरणादाय सर्वाँना मिळाले ते आपले भाग्य!तर ऑर्केस्ट्रा गायिका सौ. शारदा धोत्रे (नातेपुते) यांनी सुंदर असे भारूड सादर करून वाहवा मिळवली.
श्री घनश्याम जाधव (पुणे) ह्यांनी वडार गीत गाऊन समाज प्रबोधनवर सुंदर सादरीकरण केले. आणि सर्वांचे मन जिंकले व शिवशाहीर श्रीगंगाराम नलवडे (इचलकरंजी) पोवाडा सादर करून शौर्यकथा सादर केले आणि इतिहास जागा केला व सुंदर असे वडार गीत गायले.
हम भी कुछ कम नहीं !हे अपंग असूनही सुंदर डान्स करणारे श्री. आण्णा धोत्रे (टेंभुर्णी) ह्यांचे नॄत्य पाहून उपस्थितांनी सलामी दिली आणि दिव्यांग कलाकार श्री. आकाश पवार (पुणे) यांने सुंदर असे गायन करून सर्वांना ठेका धरायला लावला.
तसेच कलाकार, क्रिडा, नृत्य अविष्कार, समाज कार्य, उच्च शिक्षित आणि शासकीय अधिकारी शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटविले अशा बंधू आणि भगिनींना समाज रत्न पुरस्कार - मा. श्री. मनोहर बंदपट्टे, मुंबई (सेवाभावी कार्य), मा. श्री. सुधीर पवार, मुंबई (कुशल संघटक) , श्री मारुती अंनाप्पा विठ्ठलकर(वडर) उस्मानाबाद डब्बल महाराष्ट्र केसरी उप विजेता, श्रीमती सुशिला काशिनाथ पाथरवट मंगळवेढा दिव्यांग मंतीमंद अध्यक्षिका, सौ शुभांगी जगदिश कलकेरी सोलापूर आधार संस्था अध्यक्षिका , श्री बाबाजी लक्ष्मण धोत्रे रोहा कवी व आदर्श शिक्षक, श्री घनश्याम जाधव पुणेवडार गीत, शिव शाहीर श्री गंगाराम नलावडे इचलकरंजी , षनमुख्यानंद ह दाते कला शिक्षक , सौ गिताताई मूर्ती व समाज गौरव पुरस्कार -कु अमर दूर्गाप्पा पोवार कोल्हापूर उत्कृष्ट वक्ता, श्री गोविंद तांदळे कर्जत ओ सि सी आय विशेष कार्य , श्री संदिप पवार सातारा उत्कृष्ट पत्रकार, श्री अनिल पवार इंदापूर उत्कृष्ट समाजसेवक, सौ निर्मला अशोक कुराडे पुणे परी संस्थापक, कु गोपाळ माने उस्मानाबाद शिव प्रवक्ता, वडार प्रेरणा कन्या रत्न पुरस्कार मा. सौ.सुवर्णाताई शिंदे-चौगुले पुणे जेलर, कु अनिता हुलसुलकर लातूर उच्च शिक्षित, कु प्रतिक्षा बंडगर लातूर नृत्यागण, कु वनिता निंबाळकर जुन्नर कवयत्री, कु प्रणाली वडार सांगली बडमिंटन आंतर राष्ट्रीय खेळाडू, कु पुजा जिरे अमरावती योगा, कु भारती धोत्रे अकलूज एन जी ओ, कु संध्या देवकर बार्शी चित्रकार कुक, कु सुहानी देवकर लातूर कला गुण, कु श्रेया देवकर बार्शी नृत्यागणा, कु मोहिनी देवकर बार्शी नृत्यगणा , रविना मारुती दिंडे पुणे उच्च शिक्षित विशेष गुण, कु वर्षा शिंगाडे कोल्हापूर उच्च शिक्षित विशेष गुण, कु आरती कोमरेकर राष्ट्रीय खेळाडू, कला / क्रिडा रत्न पुरस्कार कु चंद्रकांत माने पुणे गायक , श्री राजेश पवार सोलापूर कोरोग्रफी, कु पंकज माने कराड आंतर राष्ट्रीय खेळाडू, कु सुदर्शन वडर सांगली आंतर राष्ट्रीय खेळाडू , श्री गणेश चव्हाण सांगली आंतर राष्ट्रीय खेळाडू, कल्याण पवार अहमदनगर गायक व मिमिक्रीमी, कु गणेश ननावरे करमाळाअभिनय, कु विशाल पवार पुणे नृत्य, श्री अभिमान विटकर पुणे मिमी क्रिमी, सतीश भाऊसाहेब पवार सातारा चित्रकार ,आदर्श माता पुरस्कार मध्ये श्रीमती नंदा धोत्रे पुणे व सौ जयश्री धांडे कर्जत आणि आदर्श माता- पिता पुरस्कार मध्ये सौ/ श्री सिद्धुताई शिवाजी चीमा कुराडे जालना, सौ/श्री वत्सला अंबर भगवंता पवार जुन्नर- विशेष गुणवंत पुरस्कार श्री आण्णा धोत्रे टेभूर्णी गुणी कलाकार डान्सर इत्यादी पुरस्कार देण्यात आले. विशेष सत्कार मुर्ती मा श्री बजरंग चौगुले पुणे डी वाय एस पी यांचा देखील खास सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमात तर सर्वांना फटका सुंदर शब्दांनी खुर्चीला खिळवून ठेवण्याची ताकद असणारी नारी म्हणजे मा. माधुरीताई चव्हाण, व रंगत खटके विनोदी करून श्री. दिपेश पिटेकर, विनोदी हास्य सम्राट श्री. शांताराम मनवरे, याचे सूत्रसंचालन झाले.
या कार्यक्रमाचे संयोजन श्री. हरिष बंडीवडार, पुणे श्री. मनोहर मुधोळकर, सोलापूर, श्री. अशोक पवार, पुणे; शिर्डी एक्सप्रेस चे संपादक- श्री. रमेश जेठे, अ. नगर, श्री. लक्ष्मण पवार, पुणे श्री. श्याम विटकर, श्री अनिल विटकर पुणे, श्री. संदिप शिंदे, पुणे, इत्यादी यांनी उत्तम संयोजन केले आहे. आणि निमंत्रक श्री. हरिभाऊ कुसाळकर, श्री. रविंद्र माने, श्री. रामू धोत्रे, श्री. आप्पाराव इटेकर इत्यादी होते.
ही संस्था वडार समाजाचे सलग ७ वर्षे यशस्वी विविध उपक्रम राबवत आहे शिवाय कोविड महामारी साथी रोगात सुद्धा अखंड पणे कार्य चालू होते अशी एकमेव संस्था महाराष्ट्र राज्यात आहे वडार वधु - वर व पालक परिचय राज्यस्तरीय महामेळावा, जागतिक महिला दिन, अखिल भारतीय वडार समाज बोली भाषा साहित्य संमेलनास आणि गोलमेज परिषद यास विशेष सहकार्य असे अनेक उपक्रम राबविले आहेत. अशी माहिती संयोजन समितीचे प्रमुख श्री. अशोक पवार यांनी माहिती दिली आहे.

