shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पठारभागात अवैध गौण खनिजाची वाहतूकदोन डंपर पकडले..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ मार्च २०२२


पठारभागात अवैध गौण खनिजाची वाहतूक
दोन डंपर पकडले..!!

संगमनेर : तालुक्यातील बोटा परिसरात अवैध गौण खनिज मुरूम व मातीची वाहतूक करणारे दोन डंपर उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.21) व शुक्रवारी (दि.25) रोजी करण्यात आली. संबधित वाहने घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभागीय कार्यालयाचे पथक बोटा परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन संबंधी माहिती घेत असताना सोमवारी (दि.21) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अवैध मुरुमाची वाहतूक करणारा डंपर (क्रमांक एम.एच.17 बी.वाय.6164) पथकाने पकडला. चालकाचे नाव अशोक रामदास शिंगोटे व मालक अरुण किसन कुरकुटे (रा. कुरकुटवाडी ता. संगमनेर) असल्याचे ताबा पावतीत म्हटले आहे.

शुक्रवारी (दि.25) रात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास म्हसवंडी-आंबी दुमाला रस्त्यावर अवैध गौण खनिज मातीची वाहतूक करणारा डंपर (क्रमांक एम.एच.17 बी.वाय.7904) उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने पकडला. सदर गौण खनिजाचे अंदाजित परिमाण 6 ब्रास असून चालकाचे नाव किशोर नामदेव नेहे (रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) व मालकाचे नाव भिवा ढेरंगे (रा. आंबी दुमाला, ता. संगमनेर) असल्याचे ताबा पावतीत म्हटले आहे.


दोनही वाहने घारगाव पोलीस ठाणे आवारात लावण्यात आली असून ही कारवाई नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांसह पथकाने केली. या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे महसूल विभागाने सांगितले. पठारभागात मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावाखाली डोंगर सपाट करत मुरूम विकला जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये गावपुढारी अग्रेसर असून त्यांना कायम महसूल अधिकार्‍यांचे अभय मिळत आले आहे. मात्र संगमनेर प्रांताधिकारी यांच्या कारवाईमुळे गावपुढार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close