नक्की वाचा....✍🏻_
मित्रांनो आपल्या दुखी असण्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केल्यावर तुमच्या लक्षात येईल की, नकारात्मक किंवा वाईट विचार करण्याची आपली सवयच आपल्या दुःखाच, अपयशाच खर कारण आहे. आपल्यातील प्रत्येकाला आनंदी आयुष्य जगावे वाटत असते. आपण आनंदी असताना एखादाच भीतीचा विचार येतो आणि मग आपण लगेच दुःख होतो. म्हणूनच आपल्याला हे शोधायचा आहे की असे कोणते विचार आहेत जे आपल्याला आनंदी आयुष्य जगण्यापासून रोखत आहेत.
आपण आयुष्य जगताना एवढ व्यस्त झालोय की, आपण आयुष्य जगत आहोत की संपवत आहोत हेच आपल्या लक्षात येत नाहीये. मित्रांनो आपण कायम एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे सकारात्मक विचारच आपले आयुष्य घडवत असतात. म्हणून सकारात्मक विचार करण्याची सवय आपल्याला लावून घ्यायची घ्यावी लागेल. आपल्या मनासारखा थोडं जरी घडलं नाही तर आपण लगेच दुःखी होतो. खरंच स्वतःला एक प्रश्न विचारा की, खरंच एखादी गोष्ट जर मनासारखी घडली नाहीतर दु:खी व्हावेच लागते का ? आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे कधीच घडणार नाही. म्हणूनच ज्या गोष्टी मनाविरुद्ध घडले आहेत त्या जसाच्या तसा स्वीकारा म्हणजे त्रास होणार नाही. त्या गोष्टी कालांतराने आपण स्वीकारतच असतो परंतु लवकरच स्वीकारण्याची सवय आपल्याला लावून घ्यायचे आहे.
आज आपल्यातील प्रत्येकाला एक गोष्ट करावयाची आहे. ती म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या काही घटना आपल्याला त्रास देत आहेत. एखादं अपयश असेल, वाईट विचार असतील, मनाला दुखी करणारे विचार असतील या सर्व वाईट गोष्टींची होळी करायची आहे. यांमुळे आपला मन हलक होईल तसेच आजपासून एक नवीन आयुष्य जगण्यासाठी सुरुवात करायची आहे. आपण या पुढील आयुष्यातील प्रत्येक दिवस खुप आनंदात उत्साहात जगा .आपले आयुष्य खरच खूप सुंदर आहे, फक्त जगता आल पाहिजे...

