shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोणी काळभोर येथे पर्यावरणपुरक धुलिवंदन सन साजरा - जीवन जाधव


लोणी काळभोर: -  ग्रीन फाउंडेशन च्या माध्यमातून शुक्रवार (ता.१८) वेगळ्या पद्धतीने धुलिवंदन सन साजरा करण्यातआला. काळभैरवनाथ मंदिर तिर्थक्षेत्र रामदरा येथील ऑक्सिजन पाईट क्र. २ परिसरात  ग्रीन फाउंडेशन तर्फे लावण्यात आलेल्या जंगली  झाडांना औषध, काव आणि चुना लावून तसेच  झाडांना पाणी घालून धुलिवंदन सण साजरा करण्यात आला.

झाडांचा किडीपासून बचाव करण्याचे काम काव आणि चुना, औषध करीत असतो.  धुलिवंदन सन  पर्यावरणपुरक पध्दती ग्रीन फाऊंडेशन च्या वतीने साजरा करण्यात आला.काव व चुना देऊन,झाडांना पाणी देऊन धुलिवंदन सन साजरा करण्याचा संदेश ग्रीन फाउंडेशन च्या सदस्यांनी दिला.ग्रीन फाऊंडेशन तर्फे लोणी काळभोर तिर्थक्षेत्र रामदरा येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येते. तसेच या झाडांना दर रविवारी पाणी देऊन संवर्धन करण्याचे कामही नियमितपणे करण्यात येत आहे. वाढदिवसाचा खर्च टाळत त्या दिवशी "त्या' व्यक्‍तीच्या नावाने वृक्ष लावण्याचा आनोखा उपक्रमही ग्रीन फाउंडेशन च्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे. याला मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक जण वाढदिवसावर होणारा खर्च टाळत आपल्या नावने एक वृक्ष लावून त्यांचे संगोपन करीत आहेत. ग्रीन फाउंडेशन च्या माध्यमातून पर्यावरण पुरक धुलिवंदन सन साजरा करण्यात आला .
वेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, ग्रीन फाउंडेशन हवेली तालुका संपर्क प्रमुख बाबासाहेब यादव, जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, दिपक महानवर, भाऊसाहेब कोळपे,किरण भोसले, विजय सकट,राहुल कुंभार उपस्थित होते.
close