shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरकारी अनुदानाचा अपहार केल्या प्रकरणी चौघाविरुध्द गुन्हा दाखल..! चार दिवस पोलिस कोठडी..!

पुर्णा(कलीम सय्यद):-
पूर्णा तालुक्यातील आणि शेतकऱ्यांची ठिबक सिंचन योजनेमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी पूर्णा तालुका कृषी कार्यालयातील तत्कालीन फरार असलेल्या तालुका कृषी अधिकारी याला पूर्णा पोलिसांच्या पथकाने दिनांक 16 मार्च रोजी नांदेड येथून ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयापुढे हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा पूर्णा तालुका कृषीकार्यालय चर्चेत आली आहे.

अधिक माहिती अशी की पूर्णा तालुका कृषी कार्यालयामध्ये तालुका कृषी अधिकारी म्हणून रत्नाकर प्रभाकर देशपांडे हे सन 2015 मध्ये कार्यरत होते. त्याच्या कार्यकाळामध्ये पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान सक्षम सिंचन योजनेअंतर्गत केंद्र सरकारची विविध योजनेचे अनुदान प्राप्त झाली होती. परंतु या अनुदानाची तत्कालीन कृषी सहाय्यक श्याम एस मोड, कृषी सहाय्यक श्रीमती हटकर कावलगाव तालुका पूर्णा येथील एजंट हरीश वजे‌ या तिघांनी मिळून पूर्णा तालुक्यात जवळपास 70 शेतकऱ्यांच्या नावावर आलेले अनुदान परस्पर शेतकऱ्यांच्या सातबारा होल्डिंग जमा करून तालुक्यातील एका राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये शेतकऱ्यांची परस्पर खाते उघडून शेतकऱ्यांच्या नावावर अनुदानाच्या रकमा परस्पर उचलत या घटनेची वाच्यता झाल्यानंतर शेतकऱ्यांनी या चौघांविरुद्ध पूर्णा पोलीस स्थानकात फिर्याद दिली.


तेव्हा पूर्णा पोलिस स्थानकामध्ये या चौघांविरुद्ध कलम 420 468 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली होती. सन दोन हजार अठरा साल गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणांमध्ये कृषी सहाय्यक श्याम एस मोड कावलगाव येथील एजंट हरीश वझे यांना तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी अटक केली होती. तपास झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी तत्कालीन कृषी अधिकारी देशपांडे हा फरार होता. तर त्यासोबत कृषी सहाय्यक हटकर यांची बदली मुदखेड येथे झाल्यानंतर त्या ठिकाणाहून रजा टाकून हटकर अद्यापही फरार आहेत. दरम्यान या घटनेची गोपनीयता तपासून पूर्णा येथील पोलीस निरीक्षक सुभाष मार्कड एपीआय घाटे शेख वसीम यांनी या प्रकरणातील फरार असलेल्या कृषी अधिकारी दिनांक 16 मार्च रोजी नांदेड येथून ताब्यात घेतले. नांदेड येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याला दिनांक 17 रोजी पूर्णा पोलीस स्टेशन मध्ये आणून त्याला न्यायालयापुढे उभे केले असता पूर्ण न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी ज्योती हटकर कृषी सहाय्यक अद्यापही फरार असल्यामुळे तिला अटक करण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान बनले आहे. 

तर या प्रकरणांमध्ये अनेक जणांचे हात ओले झाले असून देशपांडे हे पोलिसांसमोर काय जवाब देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष मार्कड हे करीत आहेत.
close