shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएस अधिकारी डीसीपी सौरभ त्रिपाठी निलंबित..!अंगडिया खंडणी प्रकरण..!!

मुंबई :-डिसीपी सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगडीया खंडणी प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. कार मायकल रोड प्रकरणी मुंबई पोलिसांचे नाव डागाळले होते. त्यात आता आणखी भर पडली असून आता तर थेट पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला खंडणी प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे.

सौरभ त्रिपाठी यांचा गृहविभागाने पाठवलेला निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केल्याने सौरभ त्रिपाठी निलंबित झाले आहेत. यामुळे डागळलेल्या मुंबई पोलिसांच्या छबीवर आणखी एक डाग लागला आहे. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. सरकारने गृह विभागाचा प्रस्ताव मान्य केला आहे.

मुंबईतील गुप्त व्यापार करणारे अंगडीयांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने फरार घोषीत केले होते. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांच्याच प्रशासकीय विभागाने पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला होता. तो प्रस्ताव अखेर राज्य सरकारने मान्य केला असून सौरभ त्रिपाठींना निलंबित करण्यात आलं आहे.

अंगडीया खंडणी प्रकरणी कारवाई म्हणून झोन 2 मधून ॲापरेशनल विभागात सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली.

पण पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी काही दिवसांपासून त्यांच्या कामावर येत नव्हते. चौकशीकरता सौरभ त्रिपाठी यांचा शोध मुंबई क्राईम ब्रांच घेत होती, याकरता 5 टीम बनवून पोलीस सौरभ त्रिपाठी यांचा मागोवा घेत होते. मुंबई पोलीस सौरभ त्रिपाठी यांच्या लखनऊ येथील घरी देखील पोहोचली पण सौरभ त्रिपाठी तेथे देखील सापडून आले नाहीत. सौरभ त्रिपाठी यांच्या पत्नीने मुंबई पोलीस मुख्यालयाला पत्र लिहून सौरभ त्रिपाठी यांची प्रकृती ठीक नाहीये, त्यामुळे ते काही दिवस कामावर हजर राहणार नाहीत अशी माहिती दिली.


तसे पहाता सौरभ त्रिपाठी यांच्यावर ज्या जलद गतीने कारवाई करण्यात येत आहे, हे पाहता या प्रकरणात नक्कीच असं काही तरी मोठं दडलंय ज्याचा खुलासा झाल्यावर मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ माजेल असंच दिसतय. पण ही जलद गतीने करण्यात येणारी कारवाई काही जणांना वाचवण्यासाठी तर केली जात नाही ना? अशी चर्चा आता दबक्या आवाजात मुंबई पोलीस दलात सुरु आहे.
close