पूर्णा । प्रतिनिधी :-
एकेकाळी वैभवशाली परंपरा लाभलेली रेल्वे शाळा आगामी क्षैक्षणीक वर्षांपासून कायमची बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वेच्या नकाशात पूर्णा हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत काचिगुडा- मनमाड रेल्वे मार्गावरील हे एक मध्यवर्ती ठिकाण. १८९९-१९०० या कालावधीत या भागात रेल्वे सुरू झाली.द.म.रे.च्या हैदराबाद विभागात त्याचा समावेश झाला.
इंग्रजांच्या निजामांच्या राजवटीत पुलींग पॉईन्ट म्हणून पूर्णा रेल्वे स्थानकास मोठं महत्त्व प्राप्त झाले. उपविभागीय स्वरुपाची विविध रेल्वे कार्यालये येथे कार्यान्वित झाली.सुमारे २०० एक्कर परिसरात रेल्वेची वसाहत निर्माण झाली.त्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधा येथे निर्माण केल्या गेल्या त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे प्रशासनाने कर्मचार्यांच्या मुलांसाठी येथे शाळा सुरू केली.१९०३ मध्ये रेल्वे शाळेची स्थापना झाली. त्यावेळी ’ऍग्लो इंडिअन प्रायमरी स्कूल’असे नाव देण्यात आले.
दक्षिण मध्य रेल्वेत तेलगू भाषीक कर्मचारी व अधिकारी यांचा सातत्याने प्रभाव राहीला.त्यामुळे येथे मराठी माध्यमासोबतच इंग्रजी व तेलगू माध्यमांचे क्षैक्षणीक विभाग चालू झाले.कालांतराने कनिष्ठ महाविद्यालया पर्यंत वर्गांना मान्यता मिळाली.पूर्णेत मोठी रेल्वे वसाहत असल्याने रेल्वेच्या या सर्व शाळांना विद्यार्थी व पालकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. लवकरच रेल्वेच्या या शाळांचा नावलौकिक झाला.विशेषत; स्कॉऊट गाईडच्या क्षैत्रात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.क्षैक्षणीक, सांस्कृतिक,कला, क्रीडा, इत्यादी क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळाली.येथिल कनिष्ठ महाविद्यालयाची प्रयोग शाळा व वाचनालय व ग्रंथालय खर्या अर्थाने समृद्ध आहे.
वैभवशाली शता;युषी परंपरा लाभलेल्या पूर्णा रेल्वे जंक्शनला प्रांतवाद,भाषावाद व राजकीय पाठबळाच्या अभावी घरघर लागली.येथिल रेल्वे कार्यालयांचे स्थलांतर व विकास योजनांबाबत आखडता हात घेतला गेला.या अन्यायकारक कृतीमुळे हळूहळू पूर्णेचे रेल्वे वैभव नामशेष होऊ लागले. क्षैक्षणिक क्षेत्रातील तेलगू माध्यम पाठोपाठ मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला गेला.कोट्यावधींची क्षैक्षणिक साधन सामुग्री वाया गेली.१९८६ मध्ये ’रेल्वे मिक्सड हायस्कूलला’केद्रीय बोर्डाला संलग्न करीत सि.बी.एस.सी.अभ्यासक्रम देऊन केवळ काही वर्ग चालू ठेवण्याचा दिखावा केल्या गेला.आणी अखेर येथिल रेल्वेचे क्षेक्षणिक पर्व आगामी २०२२-२३ या क्षैक्षणिक वर्षांपासून कायमचं बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
सीबीएससी मंडळास पत्र...!
नांदेड रेल्वे प्रशासनाच्या मंडल कर्मिक अधिकारी जय शंकर चव्हाण यांनी रेल्वे शाळा येत्या क्षैक्षणिक क्षेत्रात नविन प्रवेश देण्यात येऊ नयेत तसेच येथिल शाळेत सध्य स्थितीत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाळांत प्रवेश देण्यासाठी योग्य कार्यवाही करावी असे सि.बी.एस.सी बोर्ड दिल्ली यांना दि.२२ रोजी निर्गमित केलेल्या पत्राद्वारे कळविले आहे.
हे तर एक द्दष्टचक्र....!
स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वेचे मध्यवर्ती केंद्र म्हणून इंग्रजांनी पूर्णेचे महत्व ओळखले मात्र स्वातंत्रोत्तर काळात रेल्वे प्रशासनाने मराठवाडा व पूर्णा भागावर सातत्याने अन्याय केला.प्रांत व भाषा द्वेषाने येथिल रेल्वेचा विकास खुंटला परिणामी पूर्णेच्या रेल्वे कार्यालयाला उच्च दर्जा देण्या ऐवजी येथिल कार्यालयांचे स्थलांतर, विभाजन, किंवा बंद करण्याचे षडयंत्र रचले.एकेकाळी नावाजलेल्या शाळा बंद करणे त्या दृष्टचक्राचे उदाहरण आहे. मराठवाड्याला प्रथमच रेल्वेमंत्री पद लाभल्याने मराठवाड्याला दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रांतवादातुन मुक्ती मिळण्याची अपेक्षा पुर्ण होईल असे वाटते.व पूर्णेकरांनी न्याय मिळेल अशी अपेक्षा..!

